breaking-newsपिंपरी / चिंचवड

इंद्रायणी नदी स्वच्छता अभियानसारखे उपक्रम सातत्याने राबविले पाहिजेत – महापौर जाधव

पिंपरी, (महा-ई-न्यूज) – पर्यावरणाचा समतोल राखण्यासाठी व प्रदुषणमुक्त शहर बनविण्यासाठी इंद्रायणी नदी स्वच्छता अभियाना सारखे उपक्रम सातत्याने राबविले गेले पाहिजेत, असे मत महापौर राहुल जाधव यांनी व्यक्त केले.

भोसरीतील कै. अंकुशराव लांडगे नाट्यगृहात रविवारी (दि. १६) पिंपरी-चिंचवड महापालिका, अविरत श्रमदान संस्था, सायकल मित्र पुणे व महेशदादा स्पोर्ट्स फाउंडेशन यांच्या वतीने इंद्रायणी स्वच्छता अभियानासाठी घेतलेल्या रिव्हर सायक्लोथॉन जनजागृती स्पर्धेचा बक्षिस वितरण समारंभ त्यांच्या हस्ते संपन्न झाला, त्यावेळी ते बोलत होते. यावेळी शिक्षण समिती सभापती प्रा. सोनाली गव्हाणे, अतिरिक्त आयुक्त दिलीप गावडे, अविरत श्रमदान संस्थेचे सचिन लांडगे, डॉ. निलेश लोंढे, दिगंबर जोशी, माहिती व जनसंपर्क विभागाचे रमेश भोसले, प्रफुल्ल पुराणिक, विविध विद्यालयांचे मुख्याध्यापक, शिक्षक व मोठ्या संख्येने विद्यार्थी- विद्यार्थींनी उपस्थित हेते.

बक्षीस प्राप्त शाळांमध्ये अभिषेक इंटरनॅशनल स्कूल, आदर्श स्कूल, अनुराग स्कूल, आर्मी पब्लिक स्कूल, भैरवनाथ प्राथमिक विद्यालय, भारती स्कूल, भैरवनाथ विद्यालय सेकंडरी स्कूल, महात्मा फुले हायर सेकंडरी स्कूल, महात्मा फुले स्कूल, मास्टरमाईंड ग्लोबल स्कूल, मंजूरीबाई स्कूल, एम.जी.एम. स्कूल, मोतीलाल तालेरा स्कूल, नागेश्वर हायस्कूल, प्रियदर्शनी स्कूल भोसरी, प्रियदर्शनी स्कूल इंद्रायणीनगर, प्रियदर्शनी स्कूल मोशी, प्रियदर्शनी सी.बी.एस.इ. स्कूल, रामचंद्र गायकवाड स्कूल, समता माध्यमिक स्कूल, संत ज्ञानेश्वर स्कूल, संत साई स्कूल, सेठ रामधारी रामचंद्र आगरवाल स्कूल, श्रमजीवी स्कूल या शाळांचा समावेश आहे.

तसेच, श्रीराम विद्यामंदीर, सिद्धेश्वर इंग्लिश माध्यम स्कूल, एस.एन.बी.पी. इंटरनॅशनल स्कूल, एस.जी.पी. इंटरनॅशनल स्कूल, सेंट अँन्थॉनी स्कूल, स्टरलिंग स्कूल, स्वामी समर्थ-सेमी इंग्लिश स्कूल, श्री स्वामी समर्थ इंग्लिश स्कूल, लाल बहाद्दूर शास्त्री विद्यालय, यशवंतराव चव्हाण स्कूल, गायत्री स्कूल मोशी, मॅटरिक्स सी.बी.एस.इ. स्कूल, डुडळगाव प्राथमिक विद्यालय, होरीझन स्कूल, श्रमिकनगर प्रायमरी स्कूल, सोनवणे वस्ती स्कूल, अजंठानगर बॉईज स्कूल, लांडेवाडी ऊर्दु स्कूल, विद्यावर्ती विचार इंग्लिश स्कूल, यशवंतराव चव्हाण गर्ल्स स्कूल, चोविसवाडी प्राथमिक शाळा, बोपखेल प्राथमिक शाळा, पिंपळे गुरव प्राथमिक शाळा, पिंपरी वाघेरे प्राथमिक शाळा आदि शाळा व विद्यालयांचा समावेश होता.

Job AlertJob Alert Job Alert

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button