इंदिरा महाविद्यालयात राष्ट्रीय परिषद उत्साहात
![](https://mahaenews.com/wp-content/uploads/2018/12/1500123287entrancegate.jpg)
पिंपरी ( महा ई न्यूज ) – ताथवडे येथील इंदिरा महाविद्यालयामध्ये दोन दिवसीय संगणकशास्त्र राष्ट्रीय परिषद उत्साहात पार पडली. “संगणक क्षेत्रातील
सध्याच्या घडामोडी” या विषयावर सद्यस्थितीतील तंत्रज्ञान, होणारे बदल आणि विद्यार्थ्यांनी व संशोधकांना योग्य दिशेने प्रवास करण्यासाठी सखोल असे मार्गदर्शन झाले. राज्याबाहेरील व राज्यातील संशोधकांनी उत्साहपूर्ण सहभाग नोंदवून आपली संशोधने या परिषदेमध्ये सादर करण्यात आली.
या राष्ट्रीय परिषदेचे उद्घाटन एमआयटी विद्यापीठाचे कुलगुरू प्रा.डॉ. सुनील राय यांच्या हस्ते झाले. या दरम्यान इंदिरा समूहाचे समूहसंचालक प्रा. चेतन वाकळकर, प्रभारी प्राचार्य डॉ. जनार्दन पवार उपस्थित होते.
डॉ. सुनील राय यांनी संगणक क्षेत्रामध्ये बदलत्या घडामोडी व विकसित होणा-या प्रणाली यांचा परामर्श घेतला व जागतिकीकरणाच्या युगात या तंत्राचे महत्व स्पष्ट करून दिले. प्रा. चेतन वाकळकर यांनी बीटकॉईन, क्रिप्टोकरन्सी आणि ब्लॉकचेन मॅनेजमेंट इत्यादिच्या गरजा व महत्व यांवरती सखोल मार्गदर्शन केले. डॉ. जनार्दन पवार यांनी
स्वागत, प्रास्ताविक व राष्ट्रीय परिषदेचा हेतू स्पष्ट केला.
या परिषदेमध्ये संसाधन व्यक्ती म्हणून डॉ. सुर्दशन अय्यंगार(आयआयटी, पंजाब), डॉ. अमोल आडमुठे(आरआयटी, इस्लामपूर, जि.सांगली) यांनी संशोधकांना माहिती आणि तंत्रज्ञान व संगणक क्षेत्रातील आव्हाने, बदलते प्रारुप याविषयी मार्गदर्शन केले. या परिषदेमध्ये 21 संशोधन पेपर सादर करण्यात आले. हि सर्व संशोधने “रिव्हीव्ह ऑफ रिसर्च” या राष्ट्रीय संशोधन नियतकालीकामध्ये (युजीसी मान्यताप्राप्त) प्रसिध्द करण्यात आली आहेत.
या परिषदेत उत्कृष्ट संशोधने सादर करणा-या संशोधकांना गौरविण्यात आले. प्रथम पारितोषिक प्रा. गौरी वैद्य तर व्दितीय पारितोषिक प्रा. सारीका ठाकरे, प्रा. सुनील मोरे, पियुष ठाकरे, जेफ मॅथ्यु तर तृतीय पारितोषिक प्रा. अनिरुध्द म्हसीतकर यांच्या संशोधनांना घोषित करण्यात आले. सदरील राष्ट्रीय परिषदेचा समारोप प्रा.डॉ. संजय कप्तान, माजी वाणिज्य विभागप्रमुख सावित्रीबाई फुले पुणे विद्यापीठ,पुणे यांच्या समारोपीय भाषणाने करण्यात आला.
या परिषदेत राज्यभरातून 50 हून अधिक संशोधकांनी सहभाग नोंदविला. संशोधन परिषद यशस्वी करण्यासाठी डॉ. जर्नादन पवार यांच्या मार्गदर्शनाखाली प्रा. शिवेंदु भूषण, प्रा. सरिता बैगर, प्रा. अश्विनी शेंडे यांनी विशेष परिश्रम घेतले. डॉ. तरिता शंकर, संस्थापक इंदिरा समूह यांनी राष्ट्रीय परिषद यशस्वी होण्यासाठी योग्य मार्गदर्शन व प्रोत्साहन दिले.