Breaking-newsताज्या घडामोडीपिंपरी / चिंचवड
आळंदी-इंद्रायणीत वारकरी गेला वाहून
![](https://mahaenews.com/wp-content/uploads/2018/07/1-1-3.jpg)
पिंपरी (महा ई न्यूज ) – पुणे जिल्ह्यातील खेड तालुक्यातील आळंदी येथील इंद्रायणी घाटावर गुरुवारी (दि.२६) रोजी सकाळी सात वाजता वसंत लहाने (वय ५५ ) हे वारकरी आंघोळ करत असताना नदी पात्रामध्ये वाहून गेले. वसंत लहाने यांना आळंदी घाटापासून ते चर्होलीपर्यंत बोटीतून शोधमोहिम चालू असल्याची माहिती बोटचालक विलास पवार, प्रसाद बोराटे यांनी दिली. सकाळी माऊली दर्शनासाठी जाण्यापूर्वी ते इंद्रायणीवर स्नानासाठी गेले होते, असे नातेवाईकांनी सांगितले.