Breaking-newsताज्या घडामोडीपिंपरी / चिंचवडपुणे
आयुक्त कपड्यावर अन्ं आम्ही उघड्यावर, महापालिकेसमोर विद्यार्थ्यांचे अर्धनग्न आंदोलन
![](https://mahaenews.com/wp-content/uploads/2019/06/IMG-20190626-WA0027.jpg)
– आठ दिवसात शालेय साहित्याचे वाटप करु, शिक्षण विभागाचे आश्वासन
पिंपरी ( महा ई न्यूज ) – आयुक्त कपड्यावर अन्ं आम्ही उघड्यावर… आमचं साहित्य मिळालंच पाहिजे, साहित्य आमच्या हक्काचं, नाही कुणाच्या बापाचं, रद्द करा, रद्द करा, डीबीटी रद्द करा अशा घोषणा देत रयत विद्यार्थी विचार मंचच्या वतीने आज (बुधवारी) महापालिकेसमोर विद्यार्थ्यांचा अर्धनग्न आंदोलन करण्यात आले. येत्या आठ दिवसात शालेय साहित्याचे वाटप करु, असे आश्वासन शिक्षण विभागाकडून पराग मुंडे यांनी दिल्यानंतर अर्धनग्न आंदोलन स्थगित करण्यात आले.
महापालिकेवर रयत विद्यार्थी विचार मंचचे धम्मराज साळवे यांच्या नेतृत्वाखाली आंदोलन केले. याप्रसंगी संतोष शिंदे, सतीश कदम यांच्यासह शेकडो आंदोलक सहभागी झाले होते. शहरातील कामगार, कष्टक-यांची मुले महापालिकेच्या बालवाडी, प्राथमिक, माध्यमिक शाळेत शिक्षण घेत आहेत. महापालिकेत सुमारे 55 हजार विद्यार्थी शिकत आहेत. त्या सर्व विद्यार्थ्यांना मागील 20 वर्षापासून वेळेवर शालेय साहित्य मिळत आहेत. यामध्ये गणवेश, पीटी गणवेश असे विविध साहित्य वेळेवर दिले जाते. मात्र, यंदाचे शैक्षणिक वर्षांस प्रारंभ होवून आठवडा झाला. तरी शालेय साहित्य मिळालेले नाहीत.
महापालिका शाळेतील विद्यार्थी व विद्यार्थिणीवर गणवेशाअभावी शाळेत यावे लागत आहे. ही बाब महापालिकेसाठी निंदनीय आहे. महापालिकेच्या इतिहासात पहिल्यांदाच सर्व विद्यार्थ्यांना वेळेवर शालेय साहित्य मिळालेले नाही. गेल्या कित्येक दिवसापासून विद्यार्थ्यांना शिष्यवृत्ती अद्याप मिळालेली नाही. मग डीबीटीचे रक्कम कधी मिळणार?, त्यामुळे महापालिका शाळांमध्ये डीबीटी न राबविता त्यांना शालेय साहित्याचे वाटप करावे, अशी मागणी धम्मराज साळवे यांनी केली.
![](https://mahaenews.com/wp-content/uploads/2019/06/IMG-20190626-WA0032-300x157.jpg)
दरम्यान, महापालिका शिक्षण विभागाकडून पराग मुंडे यांनी आंदोलकांची भेट घेतली. आंदोलकांचे मागण्यांचे ऐकून घेतल्या. त्यासंर्दभात आयुक्त व अतिरिक्त आयुक्तांकडे या मागण्या मांडल्या जातील. तसेच येत्या आठ दिवसात शालेय साहित्याचे वाटप करण्यात येईल. याशिवाय गणवेश, पीटी गणवेश आणि स्वेटरबाबत न्यायालयीन बाब झाली आहे. त्यावर वरिष्ठांशी बोलून आपणांस योग्य ती कार्यवाही करण्यात येईल, असे आश्वासन देण्यात आली.
विद्यार्थ्यांच्या मोर्चाकडे सत्ताधारी भाजप पदाधिकारी, आयुक्तांनी फिरविली पाठमहानगरपालिकेवर भाजप सत्ता आहे. महापालिकेच्या इतिहासात पहिल्यांदाच विद्यार्थ्यांना शालेय साहित्याअभावी शाळेत जावे लागत आहे. भाजप पदाधिका-यांना विद्यार्थ्यांचे गांभिर्य नाही. महापाैर राहूल जाधव, सत्तारुढ पक्षनेते एकनाथ पवार, स्थायी समिती सभापती विलास मडेगिरी तसेच आयुक्त श्रावण हर्डिकर, अतिरिक्त आयुक्त संतोष पाटील यांना विद्यार्थ्यांच्या प्रश्नांकडे लक्ष देण्यास वेळ नाही. या सर्वांचा रयत विद्यार्थी विचार मंचकडून निषेध करण्यात आला.