breaking-newsताज्या घडामोडीपिंपरी / चिंचवड

आयुक्तांची दिशाभूल करण्यासाठी सेवाज्येष्ठतासुचीमध्ये चक्क खोटी माहिती ?

  • प्रशासन विभागातील अधिका-यांचे कटकारस्तान
  • आयुक्तांनी दखल घ्यावी हीच अधिका-यांची अपेक्षा

पिंपरी / महाईन्यूज

पिंपरी-चिंचवड महापालिकेच्या नागरवस्ती विकास योजना विभागाचे समाज विकास अधिकारी संभाजी ऐवले यांची पदोन्नती कधी संवर्ग तर कधी वेतनश्रेणीतील तफावत दाखवून रोखली जात आहे. पदोन्नतीस पात्र ठरणारा संवर्ग, वेतनश्रेणी आणि ग्रेड ‘पे’चा उल्लेख सेवाज्येष्ठतासूचीवर येऊ न देण्याचा कट प्रशासनातील काही अधिका-यांनी रचला आहे. यातील खरी बाब आयुक्तांच्या निदर्शनास येत नसल्यामुळे ऐवले यांची पदोन्नती कागदावरच रखडली आहे. ऐवले यांच्याबाबत दिशाभूल करणारी माहिती सेवाज्येष्ठतासूचीवर दर्षवून आयुक्तांच्या डोळ्यास अंजन घातले जात आहे. अशा संबंधित अधिका-यांवर कारवाई होऊन ऐवले यांना पदोन्नती मिळणार का ? याकडे नागरवस्ती विभागातील कर्मचा-यांचे लक्ष लागले आहे.

नागरवस्ती विकास योजना विभागाचे समाज विकास अधिकारी संभाजी ऐवले यांना पदोन्नती देण्याचे तीन ठराव महासभेत मंजूर करण्यात आले. मात्र, त्यातील एकाही ठरावाची अंमलबजावणी करून ऐवले यांना पदोन्नती देण्यात आलेली नाही. पदोन्नती देण्याबाबत आयुक्त श्रावण हर्डीकर सकारात्मक असले तरी ऐवले यांची पदोन्नती कशी रोखता येईल, यासाठी प्रशासन विभागातील काही अधिकारीच टपून बसले आहे. त्यांनी ऐवले यांच्या सेवाज्येष्ठतासूचीवर पदोन्नतीस निर्धारित वेतनश्रेणी, ग्रेड पेचा उल्लेख आजपर्यंत येऊ दिलेला नाही. त्यामुळे ऐवले यांना पदोन्नतीपासून दूर रहावे लागले आहे.

29 जून 2019 च्या प्रपत्रानुसार संभाजी ऐवले यांची सहाव्या वेतन आयोगानुसार तत्कालीन वेतनश्रेणी 9 हजार 300 ते 34 हजार 800 व ग्रेड ‘पे’ 4 हजार 400 एवढे आहे. शासनाच्या प्रपत्रानुसार त्यांची सुधारीत वेतनश्रेणी 15 हजार 600 व ग्रेड ‘पे’ 39 हजार 100 आणि ग्रेड ‘पे’ 5 हजार 400 होणे अपेक्षित होते. मात्र, 1 जानेवारी 2019 रोजी काढलेल्या अंतिम सेवाज्येष्ठतासुचीमध्ये ऐवले यांची वेतनश्रेणी 9 हजार 300 ते 34 हजार 600 आणि ग्रेड ‘पे’ 4 हजार 400 दाखविण्यात आले आहे. ऐवले यांची पदोन्नती रोखण्यासाठी हेच कारण आयुक्तांसमोर आणले जात आहे. त्यामुळे तीन ठराव होऊन देखील त्यांना पदोन्नतीपासून वंचित रहावे लागत आहे.

यामध्ये आयुक्तांनी लक्ष घालून खरी माहिती जाणून घेतली तर संबंधित सक्रिय अधिका-यांवर कारवाई निश्चितच होईल. सेवाज्येष्ठतासुचीतील ख-या बाबी तपासल्या तर ऐवले यांना पदोन्नतीपासून कोणीच रोखू शकणार नाही. परंतु, आयुक्तांनी मनावर घेऊन सेवाज्येष्ठतासूची तपासावी, अशी अपेक्षा ऐवले यांनी व्यक्त केली आहे.

Job AlertJob Alert Job Alert

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button