breaking-newsताज्या घडामोडीपिंपरी / चिंचवड

‘आयएसी’ लि. कंपनी व्यवस्थापन आणि कामगार यांच्यात वेतनवाढ करार

  • कामगारांना १३ हजार ७५० रुपयांची वेतनवाढ
  • आमदार महेश लांडगे यांच्या पाठपुराव्याला यश

पिंपरी, (महा-ई-न्यूज) – चाकण उद्योग क्षेत्रातील आयएसी लिमिटेड निघोजे व आयएसी लिमिटेड चाकण या दोन्ही कंपनीमध्ये व स्वाभीमानी श्रमिक कामगार संघटना यांच्यात वेतन वाढीचा करार झाला आहे. कामगारांना आगामी तीन वर्षांसाठी १३ हजार ७५० रुपयांची पगारवाढ देण्यात आली आहे, अशी माहिती संघटनेचे अध्यक्ष जीवन येळवंडे यांनी दिली.

चाकण औद्योगिक वसाहतीमधील निघोजे येथे आयएसी लि. प्लॅन्ट एक आणि चाकण येथील आयएसी लि. प्लॅन्ट दोन आहे. या कंपनीतील स्वाभिमानी श्रमिक कामगार संघटना आणि व्यवस्थापनाच्या प्रतिनिधींची गेल्या अनेक दिवसांपासून वेतनवाढ आणि अन्य मागण्यांबाबत चर्चा सुरू होती. आमदार महेश लांडगे यांच्या प्रमुख उपस्थितीत गुरुवारी (दि. ७) कंपनीचे व्यवस्थापन प्रतिनिधी आणि संघटनेच्या पदाधिका-यांची बैठक घेण्यात आली. त्यावेळी द्विपक्षीय पदाधिका-यांनी स्वाक्ष-या करुन कराराचे आदन-प्रदान केले.

यावेळी सघंटनेचे प्रमुख सल्लागार रोहीदास गाडे, माथाडी कामगार नेते किसनराव बावकर, स्वाभिमानी श्रमिक कामगार सघंटनेचे अध्यक्ष जीवन येळवंडे,  सरचिटणीस कृष्णा रोहोकले, उपाध्यक्ष शाम सुळके,चिटणीस रघुनाथ मोरे, सचिव तेजस बिरदवडे, खजिनदार अमृत चौधरी, सोमनाथ जानराव, युनिट अध्यक्ष सचिन लांडगे उपाध्यक्ष विनोद दौडकर, खजिनदार अमित दुधाने, सरचिटणीस प्रवीण गव्हाणे, चिटणीस धनंजय झापर्डे, चाकण प्लॅन्टचे अध्यक्ष उमेश वाडेकर, सरचिटणीस चेतन हुले, खजिनदार गणेश पापरे आदी उपस्थित होते.

व्यवस्थापनाच्या वतीने कपंनीचे एचआर डायरेक्टर संदीप गोंगले, युनिट १ चे प्लॅन्ट हेड पवन माळसे, युनिट 2 चे प्लॅन्ट हेड उदय गोंजारे, एचआर मॅनेजर अमित काळे, युनिट 2 चे एचआर स्वप्निल पिसे, कंपनी सेक्रेटरी पराग ढेरेकर, फायनान्स कंट्रोलर यादव घुंबरे यांनी स्वाक्ष-या केल्या आहेत. कामगारांनी फटाक्याची आतिषबाजी करून भांडाऱ्याची उधळण केली. डीजेच्या तालावर नाचत आनंद व्यक्त केला. संघटनेचे अध्यक्ष जीवन येळवंडे यांनी प्रास्ताविक केले. कृष्णा रोहोकले यांनी आभार मानले.

  • कामगारांनी व्यवस्थापनाला दिलेला शब्द पाळावा
  • कोणत्याही कंपनीची वाटचाल ही कामगारांच्या कष्टावर अवलंबून असते. मात्र, कंपनी टिकली, तर कामगार आणि त्यांची नोकरी टिकणार आहे, ही वस्तुस्थिती आहे. त्याची जाणीव संघटनेच्या पदाधिका-यांनी कामगारांना करुन दिली पाहिजे. आपल्या मागण्या मान्य करण्यासाठी व्यवस्थापनाशी सकारात्मक चर्चा करुन सामोपचाराने समस्या सोडवण्यावर भर दिला आहे. व्यवस्थापनाकडून अपेक्षा ठेवताना उत्पादन क्षमतेबाबत दिलेला शब्द कामगार आणि संघटनेने पाळला पाहिजे. तसेच, कामगारांसाठी निस्वार्थपणे काम केल्यामुळेच आज इतका चांगला वेतनवाढीचा करार झाला व कामगारांना कायमस्वरुपी नोकरी मिळाली आहे, असे मत आमदार महेश लांडगे यांनी यावेळी व्यक्त केले.

कामगार आणि व्यवस्थान करारातील ठळक मुद्दे  

  • १३७५०/- रुपयाची पगार वाढ
  • कराराचा कालावधी आगामी तीन वर्षे
  • मरणोत्तर साहाय्य योजना दहा लाख रुपये व सर्व कामगारांचा एक दिवसाच पगार या त्याच्या दोन पट रक्कम कंपनी कामगाराच्या वरसास देणार
  • कामगारांचा तीन लाख रुपयांचा मेडिक्लेम
  • ग्रुप अपघात पॉलिसी ग्रॉस पगाराच्या ७२ टाईम
  • पगारी सुट्या २४० दिवसाला १५ पी एल व पुढे प्रत्येक दहा दिवसाला १ पी एल व साठवण्याची मर्यादा ५० दिवस
  • आजारपनाची रजा ८ दिवस
  • नैमित्तिक रजा ८ दिवस
  • पगारी रजा ११ दिवस
  • पगाराची उचल- दहा हजार रुपये
  • ‘ओटी’ दोनपट, पगारी सुट्टीत काम केल्यास दोनपट ‘ओटी’ व एक ‘सीऑफ’ एक टी-शर्ट, दोन ड्रेस, एक सेप्टी श्यूज देणार
  • कामगारांसाठी वार्षिक स्नेहसंमेलन
  • प्रतिवर्षी दोन गुणवंत कामगार पुरस्कार प्रत्येकी ५००० रुपये
  • दिवाळी बोनस : २० %
  • सेवा बक्षीस : पाच वर्षे पूर्ण झालेल्या कामगारास ५०००/- रुपये
  • दुसऱ्या व तिसऱ्या पाळी साठी नास्ता चालू करण्यात येईल
  • तिसऱ्या पाळीसाठी ७५ रुपये पाळी भत्ता
  • फरका पोटी प्रत्येकी १०५०००/- रुपये फेब्रुवारीच्या पगारात देण्यात येणार आहे.
Job AlertJob Alert Job Alert

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button