breaking-newsपिंपरी / चिंचवड

रहाटणीत ‘माझे कुटुंब, माझी जबाबदारी’ अभियानाचा प्रारंभ

  • रहाटणीतून कोरोनाला हद्दपार करण्यासाठी नगरसेवक बाबासाहेब त्रिभुवन यांनी कसली कंबर

पिंपरी | महाईन्यूज | प्रतिनिधी

कोरोनावर विजय मिळविण्यासाठी राज्य सरकारने मुंबई आणि पुणे शहरासाठी घरोघरी जाऊन प्रत्येक नागरिकांची तपासणी करण्याची मोहीम हाती घेतली आहे. त्यासाठी ‘माझे कुटुंब, माझी जबाबदारी’ अभियानाचा प्रारंभ करण्यात आला आहे. याच अभियानाचा रहाटणी प्रभाग क्रमांक 27 मध्ये आमदार लक्ष्मण जगताप यांच्या मार्गदर्शनाखाली व नगरसेवक बाबासाहेब त्रिभुवन यांच्या सहकार्याने जोरदार प्रारंभ करण्यात आला आहे.

पिंपरी-चिंचवड महापालिकेच्या आरोग्य विभागाच्या वतीने रहाटणी प्रभाग क्रमांक 27 मधील स्वयंसेवकांना ‘माझे कुटुंब, माझी जबाबदारी’ अभियानाच्या माध्यमातून मार्गदर्शन करण्यात आले आहे. तसेच, सर्व स्वयंसेवकांना सुरक्षा किटचे वाटपही करण्यात आले आहे. या अभियानांतर्गत महापालिकेच्या आरोग्य पथकाने रहाटणी प्रभागातील नागरिकांच्या घरोघरी जाऊन तपासणी करण्यास सुरूवात केली. मोहिमेत घरातील सर्व सदस्यांचे Spo2 तपासणी, क्रॉमॉब्रीड स्थितीची तपासणी केली जाणार आहे. कोविड सदृश्य लक्षणे आढळल्यास रुग्णास तातडीने नजीकच्या रुग्णालयात दाखल करणे. तसेच, सर्व नागरिकांना कोविडसंदर्भात योग्य माहिती व मार्गदर्शन केले जाणार आहे, अशी माहिती नगरसेवक बाबासाहेब त्रिभुवन यांनी दिली.

दरम्यान, ही मोहीम 100 टक्के राबवून आपला रहाटणी प्रभाग पूर्णपणे कोरोनामुक्त करण्याचा मानस नगरसेवक बाबासाहेब त्रिभुवन यांनी व्यक्त केला. ते स्वतः आरोग्य पथक आणि स्वयंसेवकांसह घरोघरी जाऊन नागरिकांना मार्गदर्शन करीत आहेत.

Job AlertJob Alert Job Alert

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button