आमदार महेश लांडगे यांच्या वाढदिवसानिमित्त गुणवंत महिलांचा गौरव
पिंपरी, (महा-ई-न्यूज) – चिखलीतील मोरे वस्ती येथे विविध कार्यक्रमाचे आयोजन नुकतेच करण्यात आले. त्यामध्ये गुणवंत महिला व ज्येष्ठ नागरिकांचा गौरव करण्यात आला.
आमदार महेश लांडगे यांच्या वाढदिवसानिमित्त आयोजित या कार्यक्रमास आमदार महेश लांडगे, त्याच्या पत्नी पूजा लांडगे, महापौर राहुल जाधव, अमित गोरखे, नगरसेविका साधना मळेकर, योगिता नागरगोजे, स्वीनल म्हेत्रे, स्वीकृत सदस्य संतोष मोरे, पांडा साने, माजी नगरसेवक सुरेश म्हेत्रे, मुख्य संयोजक शंकर शिंदे आणि सामाजिक कार्यकर्ते मोठ्या संख्येने उपस्थित होते.
दरम्यान, गेली 25 वर्षांपासून स्कूलबस चालवणार्या सीमा चौरे यांचा विशेष सत्कार करण्यात आला. होम मिनिस्टर कार्यक्रमातील विजेत्या अर्चना शेळके, रेखा पावसकर, माधुरी भापकर या महिलांना भेटवस्तू बक्षीस देण्यात आले. तसेच, मान्यवर व सामाजिक कार्यकर्त्यांना छत्रपती संभाजी महाराज, लोकशाहीर अण्णा भाऊ साठे, माजी पंतप्रधान अटलबिहारी वाजपेयी, बुद्धभूषण ग्रंथ आदी पुस्तके भेट म्हणून देण्यात आली. सामाजिक कार्यकर्ते शंकर शिंदे यांनी या कार्यक्रमाचे संयोजन केले.