breaking-newsTOP Newsताज्या घडामोडीपिंपरी / चिंचवड

आमदार महेश लांडगे ‘बॅक फूट’वर; नगरसेवक वसंत बोराटे ‘वेटिंग’वर?

  • प्रदेशाध्यक्ष चंद्रकांत पाटील यांच्या निर्णयामुळे इच्छुकांचा स्वप्नभंग
  • आगामी काळात संधी देण्याबाबत आमदार लांडगेंचा प्राधान्यक्रम

पिंपरी । विशेष प्रतिनिधी
पिंपरी-चिंचवड महापालिकेतील उपमहापौरपदी सत्ताधारी भाजपाचे प्रदेशाध्यक्ष चंद्रकांत पाटील यांनी नगरसेवक केशव घोळवे यांची वर्णी लावली आहे. त्यामुळे शहराध्यक्ष तथा आमदार महेश लांडगे यांचे तीव्र इच्छुक असलेले समर्थक नगरसेवक वसंत बोराटे यांचा स्वप्नभंग झाला आहे. त्यामुळे ‘मॅन ऑफ कमिटमेंट’ अशी ओळख असलेल्या आमदार लांडगे ‘बॅक फूट’वर राहीले आहे.
महापालिकेतील सत्ताधारी भाजपाचे दोन प्रमुख शिलेदार आहेत. शहराध्यक्ष तथा आमदार महेश लांडगे आणि चिंचवडचे ‘दबंग’ आमदार लक्ष्मण जगताप या दोघांसमोरही आपआपल्या समर्थक नगरसेवकांना मानाच्या पदांवर संधी देण्याचे आव्हान आहे.
उपमहापौरपदासाठी आज (दि.२) उमेदवारी अर्ज भरण्यात आला. प्रदेशाध्यक्ष चंद्रकांत पाटील यांनी सूचवले केशव घोळवे यांच्या नावावर शिक्कामोर्तब करावे लागले. विशेष म्हणजे, भाजपा नेत्या पंकजा मुंडेही घोळवेंना संधी देण्याबाबत आग्रही होत्या. दुसरीकडे, आमदार महेश लांडगे यांनी नगरसेवक वसंत बोराटे यांना संधी देण्याबाबत बाजू लावून धरली होती. पण, वरिष्ठ नेत्यांनी हस्तक्षेप केल्यामुळे इच्छुक असलेल्या बोराटे यांना मुरड घालावी लागली.


आमदार महेश लांडगेंची उशीरा पण समर्थकांना संधी…
२०१७ मध्ये महापालिकेत सत्ता मिळाल्यानंतर भारतीय जनता पार्टीच्या माध्यमातून पदवाटपात जुनागट, जगताप समर्थक, लांडगे समर्थक अशा पद्धतीने पदवाटप करण्यात आले. सुरूवातीची अडीच वर्षे महापौरपद लांडगे गटाकडे, तर महत्त्वाचे स्थायी समिती सभापतीपद जगताप गटाकडे होते. सलग तीन वर्षे स्थायी समिती जगताप गटाकडे होती. दुसऱ्या टर्ममध्ये राहुल जाधव स्थायी समिती सभापतीपदासाठी इच्छुक होते. मात्र, त्यांना माघार घ्यावी लागली. त्यानंतर लांडगे यांनी जाधव यांना महापौरपदी काम करण्याची संधी दिली. तसेच, स्थायी समिती, शहर सुधारणा समिती, शिक्षण समिती, क्रीडा समिती आदी समितींवर लांडगेंनी आपल्या समर्थकांची वर्णी लावली आहे. वास्तविक, सुरवातीला महापौरपदासाठी नितीन काळजे, राहुल जाधव आणि संतोष लोंढे इच्छुक होते. त्यापैकी काळजेंना पहिली संधी मिळाली. त्यानंतर जावध यांची वर्णी लावण्यात आली. पुन्हा स्थायी समिती सभापतीपदी आता संतोष लोंढे काम करीत आहेत. लांडगे यांची कार्यपद्धती पाहता आजवर इच्छुकांना उशीरा का असेना पण संधी देण्याबाबत यशस्वी ठरले आहेत. सध्यस्थितीला नगरसेवक वसंत बोराटे उपमहापौरपदासाठी तीव्र इच्छुक होते. त्यामुळे पंचवार्षिकमधील उर्वरित १५ महिन्यांपैकी ७ महिने केशव घोळवे यांना आणि शेवटचे ८ महिने वसंत बोराटे यांना संधी दिली जाईल, अशी चर्चा आहे.

Job AlertJob Alert Job Alert

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button