breaking-newsताज्या घडामोडीपिंपरी / चिंचवडपुणे

आमदार महेश लांडगे आणि खासदार आढळरावांची दिलजमाई

  • भोसरीतून प्रचंड मतांची आघाडी देईन

पिंपरी ( महा ई न्यूज ) – शिरुरचे शिवसेनेचे उमेदवार खासदार शिवाजीराव आढळराव पाटील यांनीही आज (शुक्रवार) भाजपचे सहयोगी सदस्य, अपक्ष आमदार महेश लांडगे यांची भेट घेवून आपआपसातील गैरसमज दूर केले.

आमदार महेश लांडगे आणि खासदार शिवाजीराव आढळराव पाटील यांच्यात हाडवैर होते. पण निवडणुकीच्या तोंडावर आढळराव पाटलांना मोठा दिलासा मिळालाय. भोसरी विधानसभेचे आमदार महेशदादा लांडगे यांची ‘मनधरणी’ करण्यात आढळरावांना यश आलंय. आढळरावांच्या प्रचारात आता आमदार लांडगे सक्रिय सहभाग घेणार आहेत.

खासदार शिवाजीराव आढळराव पाटील आणि आमदार महेश लांडगे यांच्यात कमालीचा संघर्ष गेल्या पाच वर्षात पाहायला मिळाला. महेश लांडगे यांनी हाती घेतलेल्या प्रत्येक कामात आढळराव आणि त्यांच्या समर्थकांकडून आरोपांच्या फैरी झाडल्या गेल्या होत्या. मोशी कचरा डेपोचा प्रश्न असो की वेस्ट टू एनर्जीचा प्रकल्प, खासदारांनी प्रत्येकवेळी महेश लांडगेंवर निशाना साधला होता. म्हणूनच आमदार लांडगे यांनी थेट दंड थोपटत शिरूरच्या रिंगणात उतरण्याची तयारी केली होती. त्यामुळे आढळरावांचे धाबे चांगलेच दणाणले होते. पण आता शिवसेना-भाजप युती झाल्यामुळे कट्टर विरोधकांना एकत्र यावं लागलंय.

भेटीनंतर शिवाजीराव आढळराव पाटील म्हणाले की, झालं गेलं विसरून जावा.. आता एकत्र काम करू.. शिवाय प्रचारात भाजपच्या सर्वांनी सक्रिय सहभाग घेण्याचं आवाहनही त्यांनी केलं. आमदार महेश लांडगे म्हणाले, देशाच्या पंतप्रधानपदी पुन्हा नरेंद्र मोदी यांनाच विराजमान करण्यासाठी आम्ही कटीबद्ध आहोत. युतीचा धर्म आम्ही पाळू. निवडणुकीत युतीचाच प्रचार करु आणि भोसरीतून आढळरावांनी प्रचंड मतांची आघाडी घेऊन देऊ. पण आढळरावांनी पुढेही युतीचा धर्म पाळावा, असं आवाहन त्यांनी केलं.

खासदार आढळराव पाटलांनी घेतली पक्षनेत्यांची भेट

शिरुर लोकसभा मतदारसंघाचे शिवसेना-भाजप युतीचे उमेदवार शिवाजीराव आढळराव यांनी भोसरीचे भाजप सहयोगी आमदार महेश लांडगे यांची भेट झाल्यानंतर महापालिकेचे सत्तारूढ पक्षनेते एकनाथ पवार यांच्या संभाजीनगर येथील निवास्थानी जाऊन भेट घेतली.  भाजपचे शहराध्यक्ष व आमदार लक्ष्मण जगताप, सत्तारूढ पक्षनेते एकनाथ पवार, सरचिटणीस प्रमोद निसळ, नगरसेवक रवी लांडगे, भाजपचे शहर सरचिटणीस सारंग कामतेकर, भाजपाच्या महिला शहराध्यक्षा शैला मोळक आदी यावेळी उपस्थित होते.  यावेळी उमेदवार शिवाजीराव आढळराव पाटील यांना औक्षवण करण्यात आले. लोकसभा निवडणुकीत विजयाबाबत शुभेच्छा देण्यात आल्या. 
Job AlertJob Alert Job Alert

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button