आमदार महेशदादा लांडगे युवा मंचच्या वतीने ‘पदवीधर मतदार नोंदणी महाअभियान’
जास्तीत जास्त पदवीधारकांनी नाव नोंदविण्याचे स्वीकृत सदस्य दिनेश यादव यांचे आवाहन
पिंपरी। प्रतिनिधी
पिंपरी चिंचवड शहर भारतीय जनता युवा मोर्चा आणि आमदार महेशदादा लांडगे युवा मंच यांच्या संयुक्त विद्यमाने चिखली कुदळवाडी परिसरात ‘पदवीधर मतदार नोंदणी महाअभियाना’चा प्रारंभ करण्यात आला आहे. या अभियानात जास्तीत जास्त युवा पदवीधारकांनी नाव नोंदविण्याचे आवाहन स्वीकृत सदस्य आणि भाजयुमोचे शहर सरचिटणीस दिनेश यादव यांनी केले आहे.
या अर्जासोबत तुमचा एक फोटो, आधारकार्डची झेरॉक्स आणि पदवी, पदविका प्रमाणपत्राची झेरॉक्स जमा करायची आहे. काही अर्जदारांना अद्याप प्रमाणपत्र मिळालं नसल्यास त्यांच्या पदवी वर्षाच्या मार्कशीटची झेरॉक्सही चालू शकेल. तसेच विवाहित महिलांसाठी विवाह नावनोंदणी प्रमाणपत्र अनिवार्य आहे.
पदवीधर मतदानाची संख्या वाढावी यासाठी मुळात पदवीधर मतदार वाढणं आवश्यक आहे. त्यासाठी मोठ्या संख्येने पदवीधरांनी मतदार नोंदणी करण्यासाठी पुढाकार घेणं गरजेचं असल्याचं स्वीकृत सदस्य दिनेश यादव यांनी सांगितले.