Breaking-newsताज्या घडामोडीपिंपरी / चिंचवडपुणे
आमच्या रोजगारांचा प्रश्न सुटत असेल तर पार्थ पवारांना विजयी करणार – प्रज्ञा बोधडे
![](https://mahaenews.com/wp-content/uploads/2019/04/IMG-20190421-WA0006.jpg)
खारघर, (महा-ई-न्यूज) – भाजप शिवसेना सरकारच्या काळात बेकारी वाढली आहे. सुशिक्षित तरूणांना नोकरी करण्यासाठी औरंगाबाद, पुणे, बेंगलोर अशा शहरात जावे लागत आहे. आमचे शहर विकसित असताना आम्ही नोकरी करण्यासाठी अन्य शहरात का जायचे. आमचा नोकरीचा प्रश्न कायमस्वरूपी सुटत असेल तर पार्थ पवार यांना नक्कीच विजयी करणार, असा निर्धार खारघर मधील तरूणांच्या वतीने प्रज्ञा बोधडे यांनी केले आहे.
मावळ लोकसभा मतदार संघाचे आघाडीचे उमेदवार पार्थ पवार यांनी दोन दिवसांपासून खारघरमध्ये कोपरा सभा, बैठका, पदयात्रा काढण्यावर भर दिला आहे. साकाळी मॉर्निंग वॉक करून नागरिकांचे प्रश्न जाणून घेतले. आज बेलपाडा येथील सावली, पूजा गृहनिर्माण संस्थांमध्ये जावून त्यांनी रहिवाशांशी संवाद साधला. यावेळी राष्ट्रवादी, शेकाप, कॉंग्रेसचे पदाधिकारी, कार्यकर्ते उपस्थित होते.
बोधडे म्हणाल्या की, गेल्या दहा वर्षात शिवसेनेच्या खासदाराने खारघरमध्ये एकही विकासकाम केले नाही. उलट या सरकारच्या काळात बेकारी वाढली आहे. नोकरया नसल्यामुळे तरूणांमध्ये नैराश्य आले आहे. चांगले दिवस येत असंतील तर पार्थ पवार यांना आमचा बिनशर्त पाठिंबा आहे. पार्थ यांच्या घराण्याला राजकीय पार्श्वभूमी आहे. त्यामुळे आम्हाला त्यांच्याकडून बदलाची आपेक्षा आहे.
यावेळी खारघरमधील शीख बांधवाच्या गुरुद्वारमध्येही भेट देवून तेथील नागरिकांशी संवाद साधला. तसेच बेलपाडा याठिकाणी प्रचार करताना गावातील दिव्यांग शंकर म्हात्रे यांना भेटून त्यांना सरकारच्या अपंग कल्याणकारी योजनांविषयी माहिती घेवून लाभ मिळतो का? याविषयी देखील समस्या जाणून घेतल्या.
![](https://mahaenews.com/wp-content/uploads/2019/04/IMG-20190421-WA0010-225x300.jpg)
![](https://mahaenews.com/wp-content/uploads/2019/04/IMG-20190421-WA0012-225x300.jpg)