breaking-newsTOP Newsताज्या घडामोडीपिंपरी / चिंचवड

आपल्या गाडीच्या चालकाचा अतिरिक्त आयुक्तांकडून अविस्मरणीय सन्मान

पिंपरी | महाईन्यूज | प्रतिनिधी

पिंपरी-चिंचवड महापालिकेचे अतिरिक्त आयुक्त प्रविण तुपे यांनी 35 वर्षे सेवेत असलेल्या ड्रायव्हरचा अनोखा सन्मान केला. निवृत्तीच्या दिवशी निरोपासाठी खुद्द अतिरिक्त आयुक्त प्रवीण तुपे हे ड्रायव्हिंग सीटवर बसले आणि आपल्या ड्रायव्हरचं सारथ्य केलं. तुपे गाडी चालवत होते आणि त्यांचे ड्रायव्हर दत्तात्रय गाजरे ऐटीत मागे बसले होते.

आजचा दिवस गाजरे यांच्या आयुष्यात अतिशय महत्वाचा ठरला. आनंद, दुखः आणि सन्मान अन अभिमानाचाही. 35 वर्ष महापालिकेत वाहनचालक म्हणून सेवा देणारे सेवानिवृत्त झाले. गाजरे यांच्या सेवानिवृत्तीचं हटके सेलिब्रेशन करण्याचे अतिरिक्त आयुक्तांनी ठरवलं. त्यांनी स्वत: गाजरे यांचं सारथ्य करण्याचा निर्णय घेतला. महापालिकेच्या कार्यालयापासून ते गाजरे यांच्या निवास स्थानापर्यंत ते स्वतः चालक झाले आणि दत्तात्रय यांना आपल्या जागेवर बसविले. यावेळी झालेल्या सेवानिवृत्ती समारंभात महापौरांनी त्यांना सन्मानित केलं.

आयुष्यभर आपल्या साहेबांना इच्छितस्थळी सुखरुप पोहोचविणारे दत्तात्रय गाजरे, हे अतिरिक्त आयुक्तांनी केलेल्या या सन्मानाने गहिवरून गेले. अतिरिक्त आयुक्तांनी ड्रायव्हरचा अनोखा सन्मान केल्यामुळे सध्या तुपे यांच्यावर कौतुकाचा वर्षाव होत आहे.

Job AlertJob Alert Job Alert

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button