आता शिक्षण तज्ञ वाढविणार शाळेची पटसंख्या, विद्यार्थ्यांची गुणवत्ता; मग शिक्षक काय करणार ?
![](https://mahaenews.com/wp-content/uploads/2019/02/pcmc-1_20180482470.jpg)
पिंपरी | महाईन्यूज | प्रतिनिधी
पिंपरी-चिंचवड महापालिकेच्या प्राथमिक शाळांचा दर्जा खासगी शाळांप्रमाणे करण्यासाठी तसेच विद्यार्थ्यांना मनपा शाळेकडे आकर्षीत करण्यासाठी शिक्षण समितीमध्ये शिक्षण तज्ञाची नेमणूक करण्याच्या प्रस्तावाला समितीच्या सभापती मनिषा पवार यांनी मान्यता दिली.
विद्यार्थ्यांना मनपाच्या शाळेविषयी गोडी निर्माण व्हावी. शाळेविषयी आवड निर्माण व्हावी. विद्यार्थ्यांची गुणवत्ता वाढावी. शाळेची पटसंख्याही वाढेल. त्यासाठी नवनवीन उपक्रम राबविण्याची आवश्यकता आहे. त्याकरिता महापालिकेने शिक्षण समितीच्या जोडीला शिक्षण तज्ञाची आवश्यकता असल्याचा प्रस्ताव सदस्या चंदा राजू लोखंडे यांनी समितीच्या सभेत मांडला. त्याला रेखा राजेश दर्शले यांनी अनुमोदन दिले. हा प्रस्ताव सभापती मनिषा पवार यांनी मान्य केला.
तीन वर्षासाठी शिक्षण तज्ञाची मानधन तत्वावर नेमणूक करण्यात यावी. त्यासाठी जो खर्च येईल, त्याची जबाबदारी पालिकेने घ्यावी, अशी मागणी लोखंडे यांनी प्रस्तावात केली आहे.