breaking-newsताज्या घडामोडीपिंपरी / चिंचवड

आता महिलांना महिन्यातून एक दिवस ‘तेजस्विनी’चा विनाशूल्क प्रवास

  • महापौर राहूल जाधव यांची माहिती
  • ‘पीएमपीएमएल’च्या बैठकीत झाला निर्णय

पिंपरी, (महा-ई-न्यूज) – आता प्रत्येक महिन्याच्या 8 तारखेला पिंपरी-चिंचवडमध्ये महिलांसाठी ‘पीएमपीएमएल’ची ‘तेजस्विनी’ विनाशूल्क धावणार आहे. त्याचा शुभारंभ महिला दिनापासून होणार आहे. त्याचबरोबर माजी सैनिकांच्या महिला बचत गटांनी खरेदी केलेल्या बसेस ‘पीएमपीएमएल’द्वारे चालवायला घेतल्या जाणार आहेत. त्यातून त्यांना स्वयंरोजगार उपलब्ध करून देण्यात येणार आहे, त्याला आजच्या बैठकीत मान्यता देण्यात आली, अशी माहिती महापौर राहूल जाधव यांनी सांगितली.

पीएमपीएमएलची बैठक स्वारगेट येथील कार्यालयात आज पार पडली. या बैठकीत महापौर राहूल जाधव उपस्थित होते. 125 गाड्या भाडे तत्वावर चालवायला देण्यात येणार आहेत. 440 सीएनजी बस खरेदीच्या विषयाला देखील मान्यता देण्यात आली. तसेच, पीएमपीएमएलच्या कर्मचा-यांना अंशदान वैद्यकीय उपचार मिळावेत, यासाठी ती सुविधा बिर्ला, निरामय, मॅक्स, सुर्या या रुग्णालयांत देखील उपलब्ध करून देण्यात येणार आहेत. या विषयाला मंजुरी दिली, असे महापौर जाधव यांनी सांगितले.

माजी सैनिकांच्या महिलांनी सुरू केलेल्या महिला बचत गटाला स्वयंरोजगार उपलब्ध करून देण्यासाठी बचत गटाच्या माध्यमातून बसेस चालवायला घेतल्या जाणार आहेत. त्याबदल्यात त्यांना मोबदला दिला जाणार आहे. विशेष म्हणजे त्या बसवर माजी सैनिकच चालक म्हणून काम करतील, अशी सवलत देण्यात येणार आहे. त्यामुळे माजी सैनिकांबरोबर महिलांना स्वयंरोजगार उपलब्ध होईल. या विषयाला बैठकीत मंजुरी दिली आहे, असे जाधव म्हणाले.

महिन्याच्या 17 तारखेला पालिकेत पीएमपीएमएलची बैठक
येत्या 8 मार्च रोजी महिला दिनाचे औचित्य साधून पिंपरी-चिंचवड मधील महिलांना तेजस्विनी बसने एक दिवस विनाशूल्क प्रवास करता येणार आहे. तेथून पुढे प्रत्येक महिन्याच्या 8 तारखेला शहरातील महिलांना तेजस्विनी बसने विनाशूल्क प्रवासाची सुविधा उपलब्ध राहणार आहे. तसेच, प्रत्येक महिन्याच्या 17 तारखेला पीएमपीएमएलची आढावा बैठक पिंपरी-चिंचवड महापालिकेत घेतली जाणार आहे, याच्याही ठरावाला मान्यता देण्यात आली, अशी माहिती महापौर जाधव यांनी दिली.

Job AlertJob Alert Job Alert

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button