Breaking-newsताज्या घडामोडीपिंपरी / चिंचवड
अशोक सहकारी बँकेचे संस्थापक अशोक शिलवंत यांचे निधन
पिंपरी । प्रतिनिधी
संत तुकारामनगर येथील अशोक सहकारी बँकेचे संस्थापक अध्यक्ष अशोक शिलवंत यांचे ह्दयविकाराच्या तीव्र झटक्याने दुख:द निधन झाले आहे.
ते ६० वर्षाचे होते. त्यांच्या पश्चा पत्नी, दोन मुले, एक मुलगी, नातवंडे असा परिवार आहे. राष्ट्रवादी काँग्रेसच्या नगरसेविका सुलक्षणा शिलवंत-धर यांचे ते वडील होते.
डॉ.बाबासाहेब आंबेडकर यांच्या विचारांची कास धरून सम्राट अशोकांच्या विचारांचा प्रचार आणि प्रसार करण्याचे कार्य त्यांनी केले होते. पिंपरी चिंचवड शहरातील सामाजिक कार्यात त्यांचे मोलाचे कार्य होते. एक आदर्श व्यक्तीमत्व म्हणून ते ओळखले जात होते.