breaking-newsताज्या घडामोडीपिंपरी / चिंचवडपुणे

अमेरिकेतील स्वाहिली विद्यापीठाकडून भाग्यश्री पाटील यांना डॉक्टरेट पदवी प्रदान

पिंपरी। महाईन्यूज । प्रतिनिधी ।

अमेरिकेतील स्वाहिली विद्यापीठाच्या वतीने डॉ. डी. वाय. पाटील विद्यापीठ सोसायटीच्या उपाध्यक्षा भाग्यश्री पाटील यांना ‘व्यवसाय व्यवस्थापन’ विषयात मानद ‘डॉक्टरेट ऑफ आर्ट्स’ ही पदवी देऊन गौरवण्यात आले. विद्यापीठाच्या वतीने गोवा येथे झालेल्या कार्यक्रमात पदवीप्रदान समारंभ झाला.

            भाग्यश्री पाटील यांचे शिक्षण, आरोग्य सेवा,  बायोटेक्नॉलॉजी, फलोत्पादन आणि फ्लोरीकल्चर तसेच महिला सबलीकरण या क्षेत्रात महत्त्वपूर्ण योगदान आहे.  या क्षेत्रातील त्यांचे अमूल्य योगदान आणि भावी पिढीला प्रेरणा देण्यात त्यांनी बजावलेली भूमिकेची विशेष दखल स्वाहिली विद्यापीठाने घेतली.

            पिंपरी येथे डॉ. डी. वाय. पाटील वैद्यकीय महाविद्यालय, रूग्णालय व संशोधन केंद्र स्थापन करण्यात त्यांचा पती डॉ. पी.डी पाटील यांच्यासह मोठा वाटा आहे. या रुग्णालयास केंद्रीय आरोग्य मंत्रालयाने नुकतेच स्वच्छ भारत अभियानांतर्गत खाजगी क्षेत्रातील रूग्णालयामध्ये “कायाकल्प पुरस्कार 2019” देऊन  देशातील सर्वोत्कृष्ट रुग्णालय म्हणून घोषित केले. उच्च प्रतीची रुग्णसेवा या जनहितार्थ विनामूल्य व काही सेवा या रुग्णालयात माफक शुल्कात दिल्या जातात.

            शेतकऱ्यांपर्यंत आधुनिक तंत्रज्ञान पोहोचवण्यासाठी सौ. भाग्यश्रीताई पाटील यांनी 2004 मध्ये ‘राईझ एन शाइन बायोटेक’ कंपनीची स्थापना केली गेली. या कंपनीच्या त्या व्यवस्थापकीय संचालिकाही आहेत.

            आयएसओ 9001-2015 मानांकीत ही कंपनी आंतरराष्ट्रीय स्तरावरील वनस्पतींची जगभरातील 30 हून अधिक देशांना निर्यात करते. यामध्ये मोठ्या आणि सुसज्ज टिशू कल्चर प्रयोगशाळेतही गुंतवणूक केली गेली आहे जी वर्षाला 40 दशलक्षाहून अधिक रोपे तयार करते. सौ. पाटील यांचा महिला सक्षमीकरणावर विश्वास आहे. थेऊर येथे ग्रामीण भागातील 95 टक्के महिला नोकरी उपलब्ध करून दिली आहे आणि त्यांना उत्पादन प्रक्रियेत तांत्रिक प्रशिक्षण दिले. महिलांना आर्थिक सक्षम करण्यासाठी. “बचतगट” सारख्या विशेष योजना सुरू केल्या आहेत.

            पिंपरी येथील डॉ. डी. वाय. पाटील विद्यापीठातील पदाधिकारी कर्मचारी वर्ग यांनी सौ भाग्यश्री ताई पाटील यांचे अभिनंदन केले आहे.

Job AlertJob Alert Job Alert

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button