अपहरण झालेल्या मुली अद्याप बेपत्ताच
![](https://mahaenews.com/wp-content/uploads/2018/09/Kidnapping_2017071550.jpg)
पिंपरी – अल्पवयीन मुलींच्या अपहरणाच्या घटनांमध्ये मात्र दिवसेंदिवस वाढ होत असून, अपहरण झालेल्या अनेक अल्पवयीन मुली अद्यापही बेपत्ताच आहेत. पळून जाऊन विवाहबद्ध होणाऱ्या मुलींमध्ये अशा अपहरण प्रकरणातील मुलींचे प्रमाण अधिक आहे.
शहरातून बेपत्ता होणा-या मुलींमध्ये १५ ते १६ वर्षांच्या मुलींचे प्रमाण अधिक आहे. मुलगी घरातून निघून गेल्यानंतर पालक पोलीस ठाण्यात धाव घेतात. अपहरण झाल्याची फिर्याद दाखल करतात. अनेकदा मुलीचे अपहरण करणा-या संशयित आरोपींविषयी पालक पोलिसांकडे तक्रार करतात. या संशयित आरोपींकडे कसून चौकशी केल्यानंतर मुलगी कोठे पळवून नेली याचा तपास लागू शकतो. मात्र १६ ते १७ वर्षांच्या मुलीचे अपहरण झाल्याची फिर्याद दाखल झाल्यानंतर पोलीस मुलीचा शोध घेण्याचा प्रयत्न करीत नाहीत.
दरम्यान, १८ वर्षे पूर्ण होताच, विवाहबद्ध होण्याच्या तयारीने अशा मुलींचे कोणीतरी अपहरण केले असावे, असा अंदाज व्यक्त करून पोलीस या प्रकरणांकडे दुर्लक्ष करतात. त्यामुळे अपहरण झालेल्या मुलींचा शोध लागण्याचे प्रमाण नगण्य आहे.