अपंगांच्या ‘पीएमपीएमएल’ प्रवासी पास योजनेसाठी 31 ऑगस्ट शेवटची मुदत
![](https://mahaenews.com/wp-content/uploads/2019/01/pcmc-main.jpg)
पिंपरी, (महाईन्यूज) – पिंपरी-चिंचवड महापालिकेच्या हद्दीतील अंध, अपंग, मतिमंद, मुकबधीर तसेच दिव्यांगांसाठी मोफत प्रवासी पास सुविधा राबविण्यात येत आहे. अर्ज वाटप आणि स्वीकृतीसाठी 31 ऑगस्टपर्यंत मुदत देण्यात आली आहे. अशी माहिती महापालिकेने कळविली आहे.
शहरातील अंध, अपंग, मतिमंद, मुकबधीर तसेच दिव्यांगांसाठी मोफत पुणे महानगर, परिवहन महामंडळ लिमिटेडच्या बसने प्रवासासाठी मोफत पास सुविधा लागू आहे. ही योजना राबविण्यासाठी महापालिकेच्या नागरवस्ती विकास योजना विभागाला 31 ऑगस्टपर्यंत डेडलाईन दिली आहे. पास घेण्यासाठी अर्ज वाटप आणि स्वीकृती करण्याची सुविधा पिंपरीतील नारायण मेघाजी लोखंडे कामगार भवनात करण्यात आली आहे.
या कार्यालयात सकाळी अकरा ते सायंकाळी चार या वेळेत नागरिकांना अर्ज जमा करता येणार आहे. नवीन पासेस नुतनीकरण करण्यासाठी मी कार्ड आणि ओळख पडताळणेकामी आधारकार्डची सत्यप्रत व दिव्यांग प्रमाणपत्र गेऊन अपंग नागरिकांना कार्यालयात यावे लागणार आहे. जास्तीत जास्त अपंग नागरिकांनी पास सुविधेचा लाभ घ्यावा, असे आवाहन नागर वस्ती विकास योजना विभागाचे समाज विकास अधिकारी संभाजी ऐवले यांनी दिली आहे.