breaking-newsपिंपरी / चिंचवड

अन्न-धान्य, वस्तू घरपोच करण्यासाठी व्यापारी, व्यावसायिकांना पोलिसांतर्फे ओळखपत्र द्यावे – माजी खासदार गजानन बाबर

पिंपरी| महाईन्यूज | प्रतिनिधी

देशात कोरोना रुग्णांची संख्या 500 वर तर राज्यात 100 वर  संख्या गेली आहे, अशा परिस्थितीत केंद्र सरकार, राज्य सरकार, केंद्रशासित प्रदेश वेगवेगळ्या उपाय योजना राबवत आहेत. अशातच पिंपरी-चिंचवडमधील व्यापारी व व्यावसायिकांना वस्तू व धान्य घरपोच विक्री करण्यासाठी पोलिसांनी ओळखपत्र द्यावे, अशी मागणी माजी खासदार गजानन बाबर यांनी केली आहे.
 

पिंपरी-चिंचवड व्यापारी असोसिएशन अध्यक्ष या नात्याने व पिंपरी-चिंचवड व्यापारी असोसिएशन व पदाधिकार्‍यांच्या वतीने माजी खासदार गजानन बाबर यांनी पिंपरी-चिंचवड पोलीस आयुक्त संदीप बिष्णोई यांच्याकडे मागणी केली आहे. पंतप्रधान माननीय नरेंद्र मोदी यांनी 21 दिवसांसाठी भारत लॉकडाऊनची घोषणा केली. तसेच, राज्याचे मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांनी जमावबंदी व संचारबंदी लागू केली आहे. तथापि जीवनावश्यक वस्तू व वैद्यकीय सेवा चालू राहतील त्याचा तुटवडा होणार नाही. याची माहिती व काळजी घेतली आहे. चांगल्या प्रकारे नियोजन करून कोरोना साथीला रोखण्यासाठी केंद्र व राज्य सरकार प्रयत्न करीत आहे.

जीवनावश्यक वस्तूंचा पुरवठा करीत असताना व्यापारी वर्गातील व जीवनावश्यक वितरकांच्या वर्गातील कामगारांना तसेच डिलिव्हरी बॉईजना पिंपरी-चिंचवड शहरातील पोलिस यंत्रणा वितरण करण्याकरीता जात असताना रस्त्यावर अडवत असून त्यामुळे किराणा व्यापारी, मेडिकल, गॅस वितरक व इतर जीवनावश्यक वस्तूंचा पुरवठा करताना वितरकांना तसेच व्यापारांना अडचणीला सामोरे जावे लागत आहे. त्यांना खूप मोठी अडचण निर्माण होत आहे तसेच घरपोच डिलिव्हरी करण्यासाठीही अडचणी निर्माण होत आहेत.

लोकांना घरपोच डिलिव्हरी मिळत नसल्याने दुकानाबाहेर, मेडिकल बाहेर व गॅस वितरकांच्या बाहेर रांगाच्या रांगा लावाव्या लागत आहे. गर्दीचे प्रमाण वाढत आहे, त्यामुळे कोरोना साथीचा प्रादुर्भाव वाढण्याची शक्यता आहे, यासाठी नेहमीचे ग्राहक असणाऱ्या लोकांना घरपोच डिलिव्हरी फोनद्वारे इमेल द्वारे मिळण्यासाठी व वितरणाकरीत जात असताना त्यांना अडवू नये, अशी मागणी बाबर यांनी केली आहे.

व्यापाऱ्यांना तसेच जीवनावश्‍यक वस्तू वितरकांना त्यांच्या कामगारांना आपल्या मार्फत ओळखपत्र द्यावेत. जेणेकरून त्यांची अडवणूक होणार नाही. ग्राहकांना जीवनावश्यक वस्तूंचा पुरवठा घरपोच मिळेल. त्यामुळे कोणत्याही दुकानाबाहेर गर्दी जमा होणार नाही. कोरोनासारख्या साथीला वाढण्यास आळा बसण्यास मदत होईल, अशी मागणी बाबर यांनी केली आहे.

Job AlertJob Alert Job Alert

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button