अनधिकृत बांधकामे नियमित करण्याचे किचकट नियम शिथील करण्याचे शहानपन पक्षनेत्याला का सूचले नाही – ज्ञानेश्वर कस्पटे
![](https://mahaenews.com/wp-content/uploads/2019/12/pcmc-main-2.jpg)
पिंपरी | महाईन्यूज | प्रतिनिधी
शहरातील 3 गुंठ्ठ्यांपर्यंत खासगी भूखंड विकास प्रकल्पांतर्गत ताब्यात घेण्यासाठी मिळकतधारकांना बाजार भावाच्या दुप्पट मोबदला देण्याचा निर्णय पालिकेने घेतला. या निर्णयामुळे शहरातील गोरगरीब नागरिकांचा निश्चितच फायदा होणार आहे. परंतु, या निर्णयाचा गैरफायदा होत असल्याचा साक्षात्कार पक्षनेते एकनाथ पवार यांना झाला आहे. अनधिकृत बांधकामे नियमित करण्यासाठीच्या किचकट जाचक अटी शिथील करण्याचे शहानपन पक्षनेते एकनाथ पवार यांनी दाखविले असते तर त्यांचे समाजातून कौतुक झाले असते, अशा शब्दांत राष्ट्रवादी काँग्रेसचे कार्यकर्ते ज्ञानेश्वर कस्पटे यांनी आरोप केला आहे.
यासंदर्भात ज्ञानेश्वर कस्पटे यांनी दिलेल्या निवेदनात म्हटले आहे की, विकास प्रकल्पांसाठी लागणा-या खासगी जागा ताब्यात घेण्यासाठीच्या मोबदल्यात भरपाई घेण्याच्या नियमांचा गैरवापर केला जात असल्याचा आरोप महापालिकेचे भाजपचे पक्षनेते एकनाथ पवार यांनी केला आहे. यासंदर्भात चौकशी करण्याची मागणी देखील त्यांनी केली आहे. मात्र, 3 गुंठ्ठ्यापर्यंतची मिळकत असलेल्या सर्वसामान्य नागरिकांना जागेच्या बाजारभावाच्या दुप्पट मोबदला देण्याचा निर्णय झाल्यामुळे आता नागरिकांना समाधानकारक मोबदला मिळेल. परंतु, पक्षनेत्यांच्या या संशयास्पद भूमिकेवर प्रश्नचिन्ह निर्माण होत आहे.
एकनाथ पवार यांनी नागरिकांची अनधिकृत बांधकामे नियमित करण्यासंदर्भात लागू केलेल्या जाचक अटी-शर्ती आणि शास्ती कर माफ करण्यासंदर्भात नियम शिथील करण्याचे शहानपन सुचले असले तर कौतुकास्पद ठरले असते. 3-3 गुंठ्ठ्याचे टुकडे करून बाजारभावाच्या दुप्पट मोबदला घेऊन महापालिका आर्थिक कंगाल होईल. त्यामुळे शहरातील नागरिकांना मुलभूत सोयी सुविधा पुरविणे देखील कठीण होईल, असा कयास एकनाथ पवार यांनी काढला आहे. परंतु, 500 चौरस फुटाच्या बांधकामांना करामधून सवलत देण्याचा निर्णय होताना एकनाथ पवार गप्प का बसले?. तसेच, घरोघरचा कचरा गोळा करण्यासाठी नागरिकांकडून शूल्क आकारण्याचा निर्णय होताना एकनाथ पवारांना का शहानपन सुचले नाही, असा सवालही कस्पटे यांनी केला आहे.