breaking-newsपिंपरी / चिंचवड

अतिदुर्गम ऊंबरविरा ठाकुरवाडी या आदिवासीवाडीला खासदार श्रीरंग बारणे यांची मदत

रायगड | महाईन्यूज |प्रतिनिधी

निसर्ग चक्रीवादळाचा तडाखा बसलेल्या सह्याद्रीच्या कड्या कपारीत वसलेल्या खालापूर तालुक्यातील अतिदुर्गम ऊंबरविरा ठाकुरवाडी या आदिवासीवाडीला पावसात पाच किलोमीटर चालत जात शिवसेना खासदार श्रीरंग बारणे यांनी सरकारची आर्थिक मदत पोहोचविली. तसेच अन्नधान्यांचेही वाटप करत आदिवासी बांधवांना दिलासा देण्याचे काम केले. त्यांच्यासोबत रायगडच्या पालकमंत्री अदिती तटकरे उपस्थित होत्या.

रायगड जिल्ह्यातील खालापुर तालुक्यांतील ठोंगर माथ्यावरील अती दुर्गम भागातील ऊंबरविरा ठाकुरवाडी या आदिवासीवाडीचे निसर्ग चक्रीवादळाने प्रचंड नुकसान झाले आहे. सरकारची मदत या नुकसानग्रस्त नागरिकांपर्यंत खासदार बारणे यांनी पोहोचविली. पालकमंत्री आदिती तटकरे, जिल्हा परिषदेचे पदाधिकारी, प्रांतआधिकारी वैशाली परदेशी, तहसिलदार ईरेष चपलवार उपस्थित होते.

खालापूर तालुक्यात सह्याद्रीच्या कड्या कपारीत अतिशय दुर्गम भागात ऊंबरविरा ठाकुरवाडी आदिवासीवाडी वसलेली आहे. येथे 51 घरे आहेत.  निसर्ग चक्रीवादळाचा घरांना मोठा तडाखा बसला. 51 पैकी नऊ घरांची पूर्णपणे पडझड झाली. घरांची कौले, पत्रे,  शाळा, अंगणवाडीचेही पत्रे उडून गेले होते.  प्रचंड नुकसान झाले आहे. अतिदुर्गम आदिवासी वाडी असल्यामुळे प्रशासनाला  पोहोचण्यास अडचणी येत होत्या.  तहसीलदार, स्थानिक पदाधिका-यांनी मदत तक्ताळ पोहोचविली होती.

नुकसानग्रस्तांना सरकारने दिलेली मदत त्यांच्यापर्यंत पोहोचविली. पावसात पाच किलोमीटर चालत जात नुकसानग्रस्तांना मदतीचा हात दिला. दुर्गम भागातील आदिवासी बांधवांना दिलासा दिला. 15 हजार ते एक लाखाची भरपाई दिली आहे. काही जणांच्या बँक खात्यात पैसे जमा केले. प्रातिनिधीक स्वरुपात पैसे जमा झाल्याचे प्रमाणपत्र  नऊ जणांना देण्यात आले. नुकसानग्रस्त घरांना 80 हजार ते एक लाखापर्यंत मदत केली आहे. ज्या घरांची पडझड झाली. त्या घरांच्या पीडब्ल्यूडी विभागाकडून भिंती बांधून दिल्या आहेत. घरांवर पत्रे टाकून दिले असून अन्नधान्याचेही वाटप केले, असे खासदार बारणे यांनी सांगितले.

Job AlertJob Alert Job Alert

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button