अण्णाभाऊ साठे विकास महामंडळाच्या वर्धापन दिनानिमित्त वृक्षारोपण
![](https://mahaenews.com/wp-content/uploads/2019/07/IMG-20190712-WA0062.jpg)
पुणे, – साहित्यरत्न लोकशाहीर अण्णा भाऊ साठे विकास महामंडळाच्या 34 व्या वर्धापन दिनानिमित्त पुणे प्रादेशिक विभागातील पुणे जिल्हा कार्यालयामार्फत मंजूर कर्जाच्या धनादेशांचे वितरण व वृक्षारोपनाचा कार्यक्रम महामंडळाचे अध्यक्ष अमित गोरखे यांच्या शुभहस्ते पार पडला.
येरवडा येथील डॉ.बाबासाहेब आंबेडकर सामाजिक न्याय भवनातील या कार्यक्रमात पुणे जिल्हा कार्यालयांतर्गत बीजभांडवल योजनेंतर्गत 03 व अनुदान योजनेंतर्गत 01 (एक) लाभार्थीस महामंडळामार्फत बँकांनी मंजूर केलेल्या रु.10.50 लाख कर्जापैकी महामंडळाचे बीजभांडवल रु.1.70 लाख व अनुदान रु.40 हजार प्राथिनिधीक स्वरुपात महामंडळाचे अध्यक्ष अमित गोरखे यांचे हस्ते वितरीत करण्यात आले.
या कार्यक्रमाच्या अध्यक्षस्थानी समाजकल्याण विभागाचे प्रादेशिक उपायुक्त श्री. अविनाश देवसटवार होते. कार्यक्रमास महामंडळाचे प्रादेशिक व्यवस्थापक श्री. दि. खं. खुडे, जिल्हा व्यवस्थापक, श्री. शि. लिं. मांजरे, समाजकल्याण अधिकारी श्री. विशाल लोंढे, श्री. हरेश्वर डोंगरे, सामाजिक कार्यकर्ते श्री.प्रदिप अवघडे, श्री.सुनिल बेजगमवार, श्री. राजेश राजगे, श्री.सागर गायकवाड, दिपक चकाले यांच्यासह इतर कार्यकर्ते, लाभार्थी उपस्थित होते.
महामंडळाचे अध्यक्ष श्री. अमित गोरखे म्हणाले की, “महामंडळाच्या येाजनांचा लाभ घेऊन लाभार्थीनी घेतलेल्या कर्जाची नियमितपणे परतफेड करुन अन्य समाजबांधवांना अर्थसहाय्य करण्यासाठी संधी उपलब्ध करुन द्यावी. घेतलेल्या कर्जाचा योग्यविनियोग करुन, स्वत:ची आर्थिक, सामाजिक पत सुधारावी. महामंडळ वेगवेगळ्या महामंडळाच्या चांगल्या योजना भविष्यामध्ये राबविण्यार येणार आहेत. महामंडळामार्फत तळागाळातल्या समाजापर्यंत योजनांचा लाभ पोहोचविण्याकरिता अधिकारी, कर्मचाऱ्यांनी जोमाने काम करुन अनुसूचित जातीतील मातंग समाजाच्या आर्थिक, सामाजिक, शैक्षणिक प्रगतीसाठी प्रयत्नशिल रहावे”.
महामंडळाचे कामकाज ऑनलाईन
साहित्यरत्न लोकशाहीर अण्णा भाऊ साठे विकास महामंडळाची बंद पडलेली वेबसाईट सुरू करण्यात आली आहे. तसेच, पुढे कामकाज ऑनलाईन करणार असल्याची घोषणाही यावेळी श्री. अमित गोरखे यांनी केली. तसेच, शासनाकडून महामंडळास लवकरच आवश्यक तेवढा निधी पुरविण्यात येत आहेत. अन्य बंद असलेल्या महामंडळाच्या योजनाही लवकरच सुरु करीत आहोत, असेही ते म्हणाले.