Breaking-newsताज्या घडामोडीपिंपरी / चिंचवड
अटलबिहारी वायपेयी विचारमंचतर्फे डाॅ. श्यामा प्रसाद मुखर्जी जयंती साजरी
![](https://mahaenews.com/wp-content/uploads/2019/07/IMG-20190706-WA0005.jpg)
पिंपरी ( महा ई न्यूज ) – देशाची एकता, अखंडतेसाठी आपले बलिदान देणारे, राष्ट्रभक्त, जनसंघाचे संस्थापक डॉ. श्यामा प्रसाद मुखर्जी यांची जयंती पिंपरी चिंचवड शहरात उत्साहात साजरी करण्यात आली.
चिंचवड येथील काळभोरनगरमध्ये अटलबिहारी वायपेयी विचार मंच, पिंपरी चिंचवड यांच्या वतीने स्वर्गीय डाॅ. श्यामा प्रसाद मुखर्जी यांच्या जयंतीनिमित्त त्यांच्या प्रतिमेचे पुजन करुन पुष्पहार अर्पण करीत अभिवादन करण्यात आले. या कार्यक्रमास नगरसेवक ॲड. मोरेश्वर शेडगे, राजाभाऊ दुर्गे, माऊली थोरात, भिमा बोबडे, भाजपचे शहर सरचिटणीस प्रकाश जवळकर, शहर उपाध्यक्ष नंदू भोगले, दिपकजी कुलकर्णी, देवदत्त लांडे, प्रकाश हगवणे आदी प्रमुख पदाधिकारी, कार्यकर्ते उपस्थित होते.
यावेळी स्वर्गीय डाॅ. श्यामा प्रसाद मुखर्जी यांच्या स्मृतींना उजाळा देण्यात आला. तसेच डाॅ. श्यामा प्रसाद मुखर्जी यांची प्रेरणा घेवून भारतीय जनता पार्टीची जास्तीत जास्त सदस्य नोंदणी करणे, पक्षाचे विचार तळागाळात पोहोचवून पक्षाला अधिकाधिक बळकट करण्याचा निर्धार करण्यात आला.