breaking-newsताज्या घडामोडीपिंपरी / चिंचवड

अज्ञान पाजळण्यापेक्षा निलेश राणेनी दादांचे काम पाहण्यासाठी पिंपरी-चिंचवडचा दौरा करावा

  • राष्ट्रवादी कार्यकर्ते ज्ञानेश्वर कस्पटे यांचे आव्हान
  • उपमुख्यमंत्री अजित पवारांवरील आरोपाला दिले प्रत्युत्तर

पिंपरी / महाईन्यूज

उपमुख्यमंत्री अजित पवार यांना ग्रामपंचायतचा एक सदस्य निवडून आणता आलं नाही. आजवर त्यांना राज्यात एकही विकासकाम करता आलं नाही, अशी टिका करणारे भाजपचे नेते नारायण राणे यांचे सुपुत्र निलेश राणे यांच्यावर पिंपरी-चिंचवडमधील राष्ट्रवादीचे कार्यकर्ते ज्ञानेश्वर कस्पटे यांनी सडकून टिका केली. निलेश राणे यांनी आपल्या अज्ञानाची ज्योत पाजळण्यापेक्षा दादांनी केलेला विकास पाहण्यासाठी पिंपरी-चिंचवडमध्ये फेरफटका मारावा. टिका करायची म्हणून बाष्फळ बडबड करणे म्हणजे लोकसभेतील पराभव पचनी न पडल्याचे द्योतक आहे, अशा शब्दांत कस्पटे यांनी टिकेला प्रत्युत्तर दिले.

अजित पवार यांनी महाराष्ट्राला जे चित्र दाखवलंय ते महाराष्ट्र अजून विसरलेला नाही. घोटाळे, सिंचन, बँका, वक्तव्य, ते गप्प राहिले असते आणि पाच वर्ष उपमुख्यमंत्रीपद उपभोगलं असतं तर काही वाटलं नसतं. अजित पवार हे स्वत:च्या कर्तुत्वावर एक ग्रामपंचायतीचा सदस्यदेखील निवडूण आणू शकत नाहीत, याची आम्हाला खात्री आहे. एका वर्षानंतर मागे जे काही झालं त्यावरून लोकं मागचं विसरली असं अजित पवार यांना वाटत असावं. आज आमदारांना येण्यास जे ते सांगतायत त्यांना वर्षभरापूर्वी स्वत:चे आमदार टिकवता आले नाहीत. अजित पवार हे आता बोलायला लागलेत. अजित पवारांचा इतिहास पाहिला तर त्यात लोकोपयोगी कामं दिसणार नाहीत. घोटाळे, त्यांची वक्तव्य यामुळेच ते चर्चेत असतात. लोकोपयोगी कामांसाठी अजित पवार हे चर्चेत नसतात,” असं स्पष्टीकरण राणे यांनी एका मराठी वृत्तवाहिनीशी बोलताना दिलं आहे. यावरून राष्ट्रवादीचे पिंपरी-चिंचवडमधील ज्ञानेश्वर कस्पटे यांनी राणे यांच्यावर जोरदार निशाना साधला आहे.

बारामती आणि पिंपरी-चिंचवड शहराचे शिल्पकार म्हणून अजितदादांची ओळख आहे. ही काही उगाच तयार झालेली नाही. केवळ आरोप आणि प्रत्यारोप करण्यातच राणे परिवाराला आनंद मिळतो. सत्तेच्या खुर्चीसाठी असुसलेल्या निलेश राणे यांनी शहाणपण शिकविण्याची मुळीच गरज नाही. अजिदादांनी सलग पंधरा वर्षे पिंपरी-चिंचवडे पालनपोषण केले आहे. त्यांच्या पालकत्वाखाली शहराचा कायापालट झाला आहे. प्रत्येक नागरिक येथे झालेल्या विकास कामांचा साक्षिदार आहे. याउलट 2017 मध्ये भाजपच्या कार्यकाळात शहराचा बकालपणा वाढला. पालिकेतील कोट्यवधींचा भ्रष्टाचार समोर येत आहे. अज सर्वसामान्य नागरिकांचे एकही काम वेळेत होत नसल्याच्या तक्रारी आहेत. पिंपरी-चिंचवडचा विकास पहायचा असेल तर निलेश राणे यांनी शहरातून एक फेरफटका मारून बघावा, तरच दादांचे काम कळेल. दादांवर आरोप करणे राणे यांना शोभा देत नाही, त्यांनी आपली उंची पाहूनच बोलावे, अशा शब्दांत कस्पटे यांनी निलेश राणे यांचा समाचार घेतला आहे.

Job AlertJob Alert Job Alert

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button