TOP News

पिंपरी-चिंचवडमध्ये राष्ट्रवादी शरद पवार गट आक्रमक; कार्यकर्त्यांनी केले मुंडन

पिंपरी चौकात जोरदार घोषणाबाजी : शहराध्यक्ष तुषार कामठे यांच्या नेतृत्त्वात निदर्शने

पिंपरी: केंद्रीय निवडणूक आयोगाने अजित पवारांच्या बाजूने निर्णय दिल्याने आज शरद पवार गटाने ठिकठिकाणी आंदोलन केली. पिंपरी- चिंचवड शहरातील डॉ. बाबासाहेब आंबेडकर चौकात शरद पवार गटाने निवडणूक आयोगा विरोधात घोषणाबाजी करत मुंडन आंदोलन केले. आमचा पक्ष आमचं चिन्ह शरद गोविंदराव पवार अशा आशयाचे फलक लावण्यात आले होते.

यावेळी शरद पवार गटाचे शहराध्यक्ष तुषार कामठे, माजी नगरसेविका सुलक्षणा धर यांच्यासह इतर पदाधिकारी उपस्थित होते. मंगळवारी केंद्रीय निवडणूक आयोगाने राष्ट्रवादी कुणाची आणि चिन्ह कुणाचं यावर निकाल जाहीर केला.

राष्ट्रवादी काँग्रेस पक्ष आणि चिन्ह हे अजित पवार गटाचे असल्याचा निकाल निवडणूक आयोगाने दिला आहे. यानंतर अवघ्या महाराष्ट्रातुन शरद पवार गट आणि विरोधकांनी निवडणूक आयोगावर टीका केली. याचे पडसाद पिंपरी- चिंचवड शहरात देखील उमटले असून निवडणूक आयोगाच्या विरोधात मुंडन आंदोलन करण्यात आलं. भारतात लोकशाही राहिली आहे की नाही? असा प्रश्न यावेळी कार्यकर्ते आणि पदाधिकाऱ्यांनी उपस्थित केला आहे. या देशाचा बुलंद आवाज शरद पवार, शरद पवार, पळपुट्या अजित पवारांचे करायचं काय? खाली डोके वर पाय, अशा विविध घोषणा दिल्या. शरद पवार गटाचे कार्यकर्ते आक्रमक झाले.

निवडणूक आयोगाविरोधात शरद पवार गट न्यायालयात जाणार!
दरम्यान, पक्षचिन्ह व पक्षनाव अजित पवार गटाला देण्याचा निकाल निवडणूक आयोगानं दिला असून या निकालाविरोधात शरद पवार गट सर्वोच्च न्यायालयात दाद मागणार आहे. शरद पवार गटाच्या खासदार सुप्रिया सुळे यांनी यासंदर्भात माध्यम प्रतिनिधींना माहिती दिली आहे. सर्वोच्च न्यायालयानेच नमूद केलेल्या निकषांचं उल्लंघन करून निवडणूक आयोगानं हा निकाल दिल्याचा दावा शरद पवार गटाचे आमदार जितेंद्र आव्हाड यांनी केला आहे. तसेच, जर दोन्ही गटांच्या नेत्यांचा नियुक्ती अवैध ठरते, तर मग आयोगानं कुठल्या निकषांच्या आधारावर अजित पवार गटाला पक्षनाव न चिन्ह देण्याचा निर्णय घेतला? असा सवालही आव्हाड यांनी उपस्थित केला आहे.

Job AlertJob Alert Job Alert Job Alert

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button