TOP NewsUncategorizedताज्या घडामोडीविदर्भ

बेसा परिसरात कचऱ्याचे ढीग लागून आरोग्याच्या समस्या निर्माण

नागपूर : शहराला लागून असलेल्या खेड्यांमध्ये मोठ्या प्रमाणात इमारतींचे बांधकाम झाले आणि लोकवस्तीही वाढली आहे. त्या भागात नियोजनबद्ध नागरी सुविधा विकसित करण्यासाठी नागपूर महानगर प्रादेशिक विकास प्राधिकरण स्थापन करण्यात आले. परंतु, अद्यापही कचऱ्याची विल्हेवाट लावण्याची सुविधा होऊ न शकल्याने बेसा परिसरात कचऱ्याचे ढीग लागून आरोग्याच्या समस्या निर्माण होऊ लागल्या आहेत.नागपूरला लागून मोठ्या प्रमाणात घरे बांधली जात आहे. शहरापासून २५ किलोमीटपर्यंत क्षेत्राचा नियोजनबद्ध विकास करण्यासाठी नागपूर महानगर प्रदेश विकास प्राधिकरण (एनएमआरडीए) कार्यरत आहे. ७१९ गावांचा मेट्रो रिजनचा विकास आराखडा मंजूर आहे. त्यात इतर सार्वजनिक उपक्रम आणि सुविधांसाठी भूखंड आरक्षित करण्यात आले. त्यात कचरा घरासाठी (डम्पिंग यार्ड) हिंगणा तालुक्यात आरक्षित केलेल्या १०० एकर जमिनीचा समावेश आहे.

परंतु ही जमीन अद्याप ‘एनएमआरडीए’च्या ताब्यात आलेली नाही. जिल्हाधिकारी कार्यालयाला तीन जमिनी ‘एनएमआरडीए’ला द्याव्या लागणार आहेत. शिवाय मेट्रो रिजनमध्ये वेगवेगळ्या ठिकाणी कचरा संकलन केंद्रे उभारावी लागणार आहेत. परंतु सध्या अशी कुठलीच व्यवस्था झालेली नाही. त्यामुळे संबंधित ग्राम पंचायती गावातील कचरा गोळा करून विविध ठिकाणी जमा करीत आहे. त्यामुळे या नव्याने उभ्या राहिलेल्या वस्तीतील नागरिकांना दुर्गंधींचा त्रास सहन करावा लागतो. यातून आरोग्यांच्या समस्या निर्माण होत आहेत, असे जय जवान जय किसान संघटनेचे सहसचिव अभिनव फटिंग म्हणाले.याबाबत बेसाचे सरपंच सुरेंद्र बानाईत म्हणाले, बेसा गावासाठी विकास आराखड्यात कचरा संकलनासाठी भूखंड आरक्षित नाही. त्यामुळे ग्रामपंचायतीने तात्पुरती व्यवस्था म्हणून स्मशानभूमीजवळ कचरा गोळा करण्याची व्यवस्था केली. बेसा मेट्रोरिजनमध्ये येत असल्याने ‘एनएमआरडीए’ने कचरा विल्हेवाट लावण्याची व्यवस्था करावी.

बेसा स्मशानभूमीत कचराघर

महापालिका हद्दीपलीकडे सर्वांत वेगाने विकसित झालेले बेसा या गावातील स्मशानभूमीवर कचरा गोळा केला जात आहे. त्यामुळे स्मशानभूमी शिल्लक नाही. त्यामुळे बेसातील लोकांना अंत्यसंस्कारासाठी मानेवाडा स्मशानभूमीवर यावे लागत आहे. बेसा रोड, आराधनानगरमध्ये राहणाऱ्या नागरिकांना बेसा ग्राम पंचायतीकडून जाळलेल्या कचऱ्याचा त्रास होतो.या भागात कचऱ्याचा ढीग साचले असून तेथे डुकरांचा वावर आहे. स्वच्छ भारत अभियानाचा येथे बोजवारा उडवला जात आहे, असे भाकपचे जिल्हा सचिव अरुण वनकर यांनी सांगितले.

पोही येथे नियोजन

पोही येथे ‘डम्पिंग ग्राऊंड’ करण्यात येत आहे. ती जमीन महसूल खात्याला मागितली आहे. तोपर्यंत स्वच्छ भारत अभियानाअंतर्गंत जिल्हा परिषदेने कचरा संकलनाची व्यवस्था करावी अशी सूचना करण्यात आली. बेसा येथील कचरा नजिकच्या आरक्षित जमीन संकलन केले जाईल. – मनोजकुमार सूर्यवंशी, महानगर आयुक्त, ‘एनएमआरडीए’

Job AlertJob Alert Job Alert Job Alert

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button