मोहम्मद शमीशी प्रसिद्ध अभिनेत्रीला करायचंय लग्न! पण ठेवली ‘ही’ अट..
Mohammed Shami : भारतीय संघाचा वेगवान गोलंदाज मोहम्मद शमी आपल्या गोलंदाजी मुळे सातत्याने चर्चेत असतो. सध्या सुरू असलेल्या विश्वचषकात शमीने आतापर्यंत १६ विकेट्स घेतल्या आहेत. दरम्यान, मोहम्मद शमी एका नव्या कारणामुळे चर्चेत आला आहे. मोहम्मद शमीला एका अभिनेत्रीने थेट लग्नाची मागणी घातली आहे. या प्रपोजलची सोशल मीडियावर जोरदार चर्चा सुरू आहे.
अभिनेत्री पायल घोषने ट्वीट करत शमीला लग्नासाठी विचारलं आहे. परंतु, यामध्ये तिने एक महत्त्वाची अट ठेवली आहे. शमी तू इंग्रजी सुधार…मी तुझ्याशी लग्न करण्यासाठी तयार आहे, अशी अजब ठेवत पायल घोषने मोहम्मद शमीला लग्नासाठी विचारलं आहे.
हेही वाचा – ‘ओबीसी नेत्यांनी ४० वर्षे आमचं आरक्षण खाल्लं..’; मनोज जरांगे पाटील यांचं मोठं विधान
#Shami Tum apna English sudharlo, I’m ready to marry you 🤣🤣
— Payal Ghoshॐ (@iampayalghosh) November 2, 2023
दरम्यान, मोहम्मद शमीचा काही महिन्यांपूर्वीच पूर्वाश्रमीची पत्नी हसीन जहानबरोबर घटस्फोट झाला. हसीन शमीवर अनेक गंभीर आरोप केले होते. परंतु, हे सगळे आरोप शमीने फेटाळून लावले आहेत.