‘पुढचे ६ महिने माझ्यासाठी क्रिकेट खेळू नको’; शमीला लग्नाची मागणी करणाऱ्या अभिनेत्रीची नवी पोस्ट

Mohammed Shami and Payal Ghosh : भारतीय संघाचा वेगवान गोलंदाज मोहम्मद शमी याला अभिनेत्री पायल घोष हिने लग्नाची मागणी घातली होती. शमी तू तुझं इंग्लिश सुधार, मी तुझ्यासोबत लग्न करायला तयार आहे, असं पायलने ट्वीट करत म्हटलं होतं. दरम्यान, विश्वचषकात भारतीय संघाचा पराभव झाला. त्यावर पायलने भाष्य केलं आहे.
पायल घोषने ट्वीट केलं आहे. पुढचे ६ महिने माझ्यासाठी क्रिकेट खेळू नकोस #INDvAUS #CWC23 असं पायलने म्हटलं आहे. दरम्यान, नेटकऱ्यांनी पायलच्या ट्वीटचा संबंध मोहम्मद शमीशी जोडला आहे.
हेही वाचा – ‘नरेंद्र मोदी जो ब्रँड पितात तोच आदित्य ठाकरेंच्या हातात’; संजय राऊतांचं भाजपाला प्रत्युत्तर
No more cricket for me for next 6 months #INDvAUS #CWC23
— Payal Ghoshॐ (@iampayalghosh) November 19, 2023
दरम्यान, मोहम्मद शमीने न्यूझीलंड विरुद्ध वनडे सामन्यात मोहम्मद शमीने ७ विकेट घेतले. त्यावेळी सुद्धा पायल घोषने अनेक मेसेज पोस्ट केले होते. शमी यू ब्युटी, वैगेरे लिहिलं होतं.