breaking-newsTOP Newsताज्या घडामोडीमुंबई

शिक्षण मंत्री वर्षा गायकवाड यांना पितृशोक; माजी खासदार एकनाथ गायकवाड यांचे निधन

मुंबई । प्रतिनिधी

काँग्रेसचे ज्येष्ठ नेते आणि माजी खासदार एकनाथ गायकवाड यांचं कोरोनामुळं निधन झालं आहे. त्यांना काही दिवसांपुर्वी कोरोनाचा संसर्ग झाला होता. त्यांच्यावर हॉस्पीटलमध्ये उपचार सुरू होते. उपचारादरम्यान त्यांचं निधन झालं आहे. राज्याच्या शालेय शिक्षण मंत्री वर्षा गायकवाड यांचे ते वडिल होते.

अलिकडील काळात सक्रिय राजकारणापसून एकनाथ गायकवाड हे थोडे दूर गेले होते. गायकवाड यांना कोरोनाची लागण झाल्यानंतर त्यांना ब्रीच कॅन्डी रूग्णालयात दाखल करण्यात आलं होतं. आज उपचारादरम्यान त्यांनी अखेरचा श्वास घेतला.

सन 2019 मध्ये लोकसभा निवडणुकीत काँग्रेसला दारूण पराभवाला सामोरे जावं लागलं होतं. त्यावेळी काँग्रेसचे नेते मिलिंद देवरा यांनी काँग्रेसच्या मुंबई अध्यक्षपदाचा राजीनामा दिला होता. त्यांच्या जागी माजी खासदार एकनाथ गायकवाड यांची मुंबई काँग्रेस अध्यक्षपदी वर्णी लागली होती. एकनाथ गायकवाड हे 81 वर्षाचे होते.

Job AlertJob Alert Job Alert Job Alert

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button