breaking-newsताज्या घडामोडीमहाराष्ट्रराजकारण

डिझेल नसल्याने कर्जत बस स्थानकावर प्रवाशांचे हाल

कर्जत |

डिझेल नसल्याने कर्जत बस स्थानकावर जामखेड व श्रीगोंदा आगाराच्या एसटी गाडय़ा आल्यामुळे प्रवाशांचे चांगलेच हाल झाले. आज शुक्रवारी कर्जत बस स्थानकावर सकाळी अकरा वाजेपर्यंत जामखेड व श्रीगोंदा आगाराची एकही एसटी  आलेली नव्हती. याबाबत विचारणा केली असता डिझेल नसल्यामुळे जामखेड व श्रीगोंदा आगाराने कर्जतकडे एकही एसटी पाठवली नाही अशी  माहिती समजली. यामुळे सकाळी सहा वाजल्यापासून प्रवासी एसटी बसची वाट बघत ताटकळत थांबल्याचे दिसून आले.

कर्जत येथे एसटीचे आगार नसल्यामुळे जामखेड व श्रीगोंदा आगाराच्या एसटी बस येथे येतात व त्यावरच तालुक्यातील सर्व प्रवासी अवलंबून आहेत. या आगारांमध्ये एसटी बस आली नाही तर पर्यायी व्यवस्था येथे नसल्यामुळे नागरिकांना नेहमीच त्रास सहन करावा लागतो. करोना विषाणूच्या पार्श्वभूमीवर कर्जत तालुक्यातील अनेक गावांमध्ये जाणाऱ्या एसटी गाडय़ा बंद आहेत.

  • खासगी वाहतूक बंद

करोनामुळे खासगी वाहतूक देखील पूर्णपणे बंद झाली आहे. यामुळे प्रवाशांना इतर कोणताही पर्याय नव्हता. त्यामुळे नागरिकांना एसटी बस येईपर्यंत बस स्थानकावर ताटकळत थांबावे लागण्याची घटना घडली.

  • डिझेलअभावी गाडय़ा बंद

गाडय़ांची संख्या कमी असताना आज सकाळी बस स्थानकावर श्रीगोंदा जामखेड आगारामधून एकही एसटी बस आली नाही. या दोन्ही आगारामधील गाडय़ांसाठी डिझेल नसल्यामुळे गाडय़ा सुटल्या नाहीत अशी माहिती समजली. बस स्थानकावरून पहिली गाडी कर्जतहून सकाळी सव्वासहा वाजता सुटते. ही बस देखील आज गेली नाही. सकाळी अकरा वाजेपर्यंत जामखेड व श्रीगोंदा आगाराची एकही बस आलेली नव्हती यामुळे अनेक प्रवाशांना बस स्थानकावर ताटकळत थांबावे लागले. लांब पल्लय़ाच्या कर्जत बस स्थानकावरून जाणाऱ्या एसटी गाडय़ा इतर आगारांच्या होत्या त्याच्या ठिकाणी धावताना दिसून येत होत्या.

Job AlertJob Alert Job Alert Job Alert

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button