breaking-newsTOP Newsताज्या घडामोडीमहाराष्ट्रविदर्भ

ऑक्सिजन एक्स्प्रेस महाराष्ट्रात दाखल, नागपूरनंतर नाशिकला थांबणार

मुंबई – विशाखापट्टणम स्टील प्लॅट सायडिंगमधून लिक्विड मेडिकल ऑक्सिजनच्या ७ (एलएमओ) टँकर्ससह रो-रो सेवेद्वारे पहिली ऑक्सिजन एक्स्प्रेस काल रात्री ८ वाजता महाराष्ट्रात पोहचली. नागपूर रेल्वे स्टेशनवर ही एक्स्प्रेस दाखल झाली असून राज्यासाठी ही खूप मोठा दिलासा देणारी बातमी आहे.

नागपूर स्टेशनात ऑक्सिजन एक्स्प्रेस मधील ३ टँकर उतरविण्यात येणार असून उर्वरित टँकर नाशिक रोड स्थानकात उतरविण्यात येणार आहेत. ऑक्सिजन एक्स्प्रेस आज सकाळी नाशिक रोड स्टेशनवर पोहोचणार आहे, असे मध्य रेल्वेकडून सांगण्यात आले. गेल्यावर्षीही लॉकडाऊन काळात रेल्वेने जीवनावश्यक वस्तूंची वाहतूक केली होती आणि पुरवठा साखळी कायम ठेवली होती. आपत्कालीन परिस्थितीत रेल्वे राष्ट्र सेवेसाठी नेहमीच सज्ज असून ऑक्सिजन एक्स्प्रेस त्याच भावनेतून चालवल्या जात असल्याचेही रेल्वेने नमूद केले आहे.

दरम्यान, महाराष्ट्रात दाखल झालेली ही पहिलीच ऑक्सिजन एक्स्प्रेस आहे. हा राज्यासाठी खूप मोठा दिलासा आहे.

Job AlertJob Alert Job Alert Job Alert

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button