breaking-newsTOP Newsताज्या घडामोडीराजकारण

”कोण येतंय कोण नाही, याच्यावर आमचं लक्ष” मनोज जरांगे नेमकं काय म्हणाले?

Maratha Reservation : मराठ्यांना आरक्षण मिळावं, यासाठी सरकारने सगेसोयऱ्यांची अंमलबजावणी करावी, या मागणीसाठी सहा दिवस उपोषण केल्यानंतर मनोज जरांगे उपचार घेत आहेत. छत्रपती संभाजी नगरमधल्या गॅलेक्सी हॉस्पिटमध्ये जरांगेंवर उपचर सुरु आहेत. रविवारी त्यांनी माध्यमांशी संवाद साधला.

मनोज जरांगे म्हणाले की, आम्ही सरकारला वेळ दिला असून १३ तारखेपर्यंत वाट बघणार आहोत. ज्यांनी यापूर्वी कधी भेट दिली नव्हती ते सगळे सध्या येत आहेत. आजी-माजी खासदार, आमदार हे पाठिंब्याचं पत्र घेऊन येत आहेत. त्यामुळे समाजाचं लक्ष आहे कोण येतंय आणि कोण येत नाही.

मराठा समाजाच्या एकजुटीचा हा विजय आहे, समाजाही गरज आहे. सर्वांकडूनच अपेक्षा ठेवणं आंदोलकाचं काम असतं. माझा मराठ्यांच्या एकजुटीवर आणि चळवळीवर विश्वास आहे. कोण येतंय आणि कोण येत नाही, याकडे आमचं लक्ष आहे.. असंही जरांगे पाटील म्हणाले.

हेही वाचा – शालेय विद्यार्थ्यांसाठी आनंदाची बातमी, एसटीच्या विद्यार्थी सवलत पास योजनेत क्रांतीकारी बदल

राज्य सरकारने लोकसभा निवडणुकीच्या अगोदर सगेसोयऱ्यांच्या अंमलबजावणीसाठी अधिसूचना काढलेली आहे. त्या अधिसूचनेचं कायद्यामध्ये रुपांतर करावं आणि मराठ्यांना ओबीसीमधून आरक्षण द्यावं, अशी मागणी मनोज जरांगे यांची आहे.

दुसरीकडे ओबीसींच्या हक्कासाठी जालन्यातच राज्य मागासवर्ग आयोगाचे माजी सदस्य लक्ष्मण हाके यांचं उपोषण सुरु आहे. रविवारी दुपारच्या दरम्यान त्यांची प्रकृती खालावली होती. परंतु त्यांनी उपचार घेण्यास नकार दिला आहे.

Job AlertJob Alert Job Alert Job Alert

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button