नवरात्रीत पिंपरी युवासेनेकडून विविध सामाजिक उपक्रमाचे आयोजन
पिंपरी – पिंपरी युवासेनेकडून नवरात्र उत्सवानिमित्त विविध सामाजिक उपक्रम राबविण्यात येणार असल्याची माहिती आयोजक पिंपरी युवासेनेचे युवाअधिकारी निलेश हाके यांनी दिली आहे.दिनांक ०८ ऑक्टोबर व ०९ ऑक्टोबर रोजी सर्व शासकीय दाखले (जातीचा दाखला, रहिवाशी दाखला, उत्पन्न दाखला, नॉन क्रीमीलअर दाखला) हे नागरिकांना मोफत काढून देण्यात येणार आहे. तसेच १० ऑक्टोबर रोजी मोफत पॅनकार्ड व रेशन कार्डमध्ये नाव वाढविणे, कमी करणे, पत्ता बदल, नवीन, दुरुस्ती करून देण्यात येणार आहे.
दिनांक ११ ऑक्टोबर ते १४ ऑक्टोबर पर्यंत आयुष्यमान भारत योजना राबविण्यात येणार आहे. कार्यक्रमाची वेळ सकाळी १० ते ०६ पर्यंत असणार आहे. निलेश हाके जनसंपर्क कार्यालय, एस. बी. पाटील स्कूल रोड सुखवानी ग्लोरी बिल्डिंग जवळ कार्यक्रमचे स्थळ आहे.
तरी प्रभाग क्रमांक ३० फुगेवाडी-दापोडी-कासारवाडी मधील जास्तीत जास्त नागरिकांनी ह्या उपक्रमामध्ये सहभागी व्हावे असे पिंपरी युवासेनेचे युवाअधिकारी निलेश हाके ह्यांनी केले आहे. अधिक माहिती साठी 8806720672 व 7276970972 या क्रमांकावर संपर्क साधावा.