TOP Newsपिंपरी / चिंचवडपुणे

सावधान ! पिंपरी-चिंचवडमध्ये स्वाईन फ्लूचा शिरकाव

  • प्रशासनाकडून सतर्कतेचे आवाहन : आतापर्यंत दोन रुग्णांचा मृत्यू, २१ जणांना बाधा

। पिंपरी । महान्यूज । विशेष प्रतिनिधी ।

कोरोना पाठोपाठ शहरात आता स्वाईन फ्ल्युने शिरकाव केला आहे. सध्यस्तितीत महापालिका कार्यक्षेत्रात स्वाईन फ्ल्यु (H1N1) आजाराच्या रुग्णसंख्येत वाढ होत असल्याचे दिसून येत आहे. अद्यापपर्यंत २१ रुग्ण स्वाईन (फ्ल्यु (H1N1) आजाराने बाधीत झाले असुन २ संशयित स्वाईन फ्ल्यू (H1N1) रुग्णांचा मृत्यु झालेला असल्याची माहिती महापालिकेचे अतिरिक्त आरोग्य वैद्यकिय अधिकारी डॉ. पवन साळवे यांनी दिली आहे.

या आजाराच्या पार्श्वभूमीवर महापालिकेच्या वैद्यकीय विभागाकडून शहरातील नागरिकांना आवाहन करण्यात आले आहे. याबाबत देण्यात आलेल्या प्रसिध्दीपत्रकात म्हटले आहे की, १) ताप २) घसादुखी, घशाला खवखव ३) खोकला, नाक गळणे ४) अंगदुखी ५) डोकेदुखी बालरुग्णांमध्ये सौम्य ते मध्यम स्वरूपाचा ताप आढळतो. घसादुखी असणा-या बाळांमध्ये तोंडातून अतिप्रमाणात लाळ गळताना आढळते. त्या अनुषंगाने सध्या आढळून येत असलेल्या इन्फ्लुएंझा (ए एच १ एन १) केसेस पाहता सर्वसामान्य जनतेसाठी वैयतिक पातळीवरील इन्फ्लुएंझा (ए एच १ एन १) प्रतिबंधाच्या महत्वपूर्ण उपाययोजना व खबरदारी म्हणून खालील काळजी घेणेबाबत य विभागामार्फत नागरीकांना आवाहन करण्यात येत आहे.

▪वारंवार साबण व स्वच्छ पाण्याने हात धुवा.
▪पौष्टिक आहार घ्या.
▪लिंबू, आवळा, मोसंबी, संत्री, हिरव्या पालेभाज्या या सारख्या आरोग्यदायी पदार्थाचा आहारात वापर करा.
▪धुम्रपान टाळा, पुरेशी झोप आणि विश्रांती घ्या.
▪भरपूर पाणी प्या.
▪हस्तांदोलन टाळा.
▪सार्वजनिक ठिकाणी थुंकू नका.
▪डॉक्टरांच्या सल्याशिवाय औषध घेऊ नका.
▪आपल्याला फ्ल्यु सर्दश्य लक्षणे असतील तर गर्दीच्या ठिकाणी जाऊ नका.

गंभीर स्वाईन फ्ल्यु रुग्णांवर उपचार करणारे डॉक्टर्स आणि अवैद्यकिय कर्मचारी, गरोदर महिला, उच्च रक्तदाब व मधुमेह असलेले रुग्ण (अति जोखिमचे) यांच्यासाठी पिंपरी चिंचवड महानगरपालिकेच्या रुग्णालयामध्ये स्वाईन फ्ल्यु (H1N1) प्रतिबंधात्मक लसीकरण करण्यात येत आहे. त्याचा नागरिकांनी लाभ घ्यावा.

– डॉ.पवन साळवे

Job AlertJob Alert Job Alert Job Alert

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button