breaking-newsTOP News

दिघी-बोपखेलमधील महिलांसाठी ‘हेलिकॉप्टर राईड’ची संधी

जागतिक महिला दिनानिमित्त होम मीनिस्टर कार्यक्रम

भाजपाचे चेतन घुले, उदय गायकवाड यांचा पुढाकार

पिंपरी । प्रतिनिधी

जागतिक महिला दिनानिमित्त प्रभाग क्रमांक सहा दिघी – बोपखेल मधील नागरिकांसाठी होम मिनिस्टर या कार्यक्रमाचे आयोजन केले आहे. चेतन घुले, हिराबाई (नानी) घुले, उदय गायकवाड, निर्मला गायकवाड यांच्या पुढाकारातून हा कार्यक्रम आयोजित करण्यात आला आहे. या कार्यक्रमात भाग्यवान 15 विजेत्या महिलांना हेलिकॉप्टर राईडची संधी मिळणार आहे. तसेच सहभागी सर्व महिलांना आकर्षक बक्षिसे दिली जाणार आहेत.

प्रभाग क्रमांक सहा दिघी-बोपखेल येथे जागतिक महिला दिन उत्साहात साजरा केला जाणार असून यानिमित्त होम मिनिस्टर कार्यक्रम ठेवला आहे. बुधवारी (दि. 1 मार्च) सायंकाळी सहा ते ११ वाजताच्या कालावधीत बोपखेल मधील बापूजीबुवा चौकात हा कार्यक्रम रंगणार आहे.

शालिनी फेम, सुख म्हणजे नक्की काय असतं या मालिकेतून घराघरात पोहोचलेली अभिनेत्री माधवी निमकर कार्यक्रमात विशेष आकर्षण आहेत. सिने अभिनेते क्रांतीनाना मळेगावकर व बालगायीका टीव्ही स्टार सह्याद्री मळेगावकर हे देखील कार्यक्रमासाठी उपस्थित राहणार आहेत.

खेळात सहभागी प्रत्येक महिलांना व विजेत्यांना आकर्षक पैठणी मिळणार आहे. तसेच खेळात प्रथम पारितोषिक ओव्हन, द्वितीय पारितोषिक टेबल फॅन आणि तृतीय पारितोषिक इस्त्री आहे. दिघी-बोपखेल मधील महिलांना विविध आणि आकर्षक बक्षिसांची लयलूट करण्याची संधी या कार्यक्रमाच्या निमित्ताने मिळाली आहे. लकी ड्रॉ मधील पाच आणि खेळातील दहा विजेत्या महिलांना हेलिकॉप्टर राईड मिळणार आहे. खेळात जिंकणा-या महिलांना थेट हवाई सफर अनुभवता येणार आहे.

अधिक माहितीसाठी 7528909090, 8830138515, 8805418787 या क्रमांकावर संपर्क करण्याचे आवाहन आयोजकांकडून करण्यात आले आहे.

Job AlertJob Alert Job Alert Job Alert

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button