breaking-newsराजकारणराष्ट्रिय

Opinion Poll : दिल्लीत केजरीवालांचाच बोलबाला, आप उडवणार भाजपची दाणादाण

नवी दिल्ली | महाईन्यूज

दिल्ली विधानसभा निवडणुकीमुळे सध्या दिल्लीतील राजकीय वातावरण तापले आहे. दिल्लीत सत्ताधारी आप, विरोधी पक्षातील भाजपा आणि काँग्रेस असे तीन पक्ष मैदानात आहेत. मात्र मुख्य लढत ही आप आणि भाजपामध्येच आहे. दरम्यान, आता मतदानाला काही दिवस उरले असताना दिल्लीतील मतदारांचा कल जाणून घेतला असता दिल्लीमध्ये अरविंद केजरीवाल यांचाच बोलबाला असल्याचे दिसून आले आहे. दिल्ली विधानसभा निवडणुकीत अरविंद केजरीवाल यांच्या नेतृत्वाखालील आपला 54 ते 60 तर भाजपाला 10 ते 14 जागा मिळतील असा अंदाज टाइम्स नाऊने प्रसारित केलेल्या ओपिनियन पोलमधून वर्तवण्यात आलेला आहे.

दिल्ली विधानसभा निवडणुकीला आठवडा उरला असतान टाइम्स नाऊ या इंग्रजी वृत्तवाहिनीने मतदारांचा कल जाणून घेतला आहे. त्यानुसार आजच्या घडीला मतदान झाल्याच दिल्लीत आपच बाजी मारणार हे स्पष्ट झाले आहे. दिल्लीतील 70 मतदारसंघातील एकूण सात हजार 321 मतदारांशी संवाद साधून त्यांचा कल जाणून घेण्यात आला आहे. त्यानुसार दिल्ली विधानसभा निवडणुकीत अरविंद केजरीवाल यांच्या नेतृत्वाखालील आपला एकूण 52 टक्के मते मिळतील. तर भाजपाला 34 टक्के मते मिळण्याची शक्यता आहे. काँग्रेसला मात्र मोठा फटका बसणार असून, काँग्रेसला दहा टक्क्यांच्या आत मते मिळण्याची शक्यता आहे. या मतांचे जागांमध्ये परिवर्तन केल्यास आपला 54 ते 60 तर भाजपाला 10 ते 14 जागा मिळतील. तर काँग्रेसला केवळ 2 जागांवर समाधान मानावे लागेल.

Job AlertJob Alert Job Alert Job Alert

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button