breaking-newsTOP Newsताज्या घडामोडीपिंपरी / चिंचवडपुणेमहाराष्ट्र

पिंपरी-चिंचवडकर त्वरा करा..मिळकतकर सवलतीसाठी उरले शेवटचे दोनच दिवस!

उद्या सुट्टीच्या दिवशीही कर संकलन कार्यालयने राहणार सुरू - सहाय्यक आयुक्त नीलेश देशमुख

पिंपरी : बकरी ईद आणि आषाढी एकादशीनिमित्त उद्या गुरुवारी महापालिकेला शासकीय सुट्टी आहे. मात्र, महापालिकेच्या कर संकलन विभागाच्या वतीने नागरिकांच्या सोयीसाठी सर्व कर संकलन कार्यालये सुरुच ठेवण्यात येणार आहेत. त्यामुळे नागरिकांनी विविध कर सवलतींचा लाभ घेण्यासाठी शेवटचे दोन दिवस बाकी असून आपल्या चालू वर्षाचा आणि थकीत कर भरावा, असे आवाहन कर संकलन व कर आकारणी विभागाचे सहाय्यक आयुक्त नीलेश देशमुख यांनी केले आहे.

पिंपरी-चिंचवड महापालिकेच्या कर संकलन व कर आकारणी विभागाच्या वतीने मालमत्ता धारकांसाठी ३० जूनपर्यंत संपूर्ण कराचा भरणा केल्यास किमान दहा टक्के व कमाल २० टक्के सवलत मिळत आहे. त्यानुसार आत्तापर्यंत २ लाख ६९ हजार ६६२ मालमत्ता धारकांनी आपल्या कराचा भरणा करून विविध कर सवलतींचा लाभ घेतला आहे. महापालिका तिजोरीत तब्बल ३७० कोटी रुपये जमा झाले आहेत.

हेही वाचा – Pimpri-Chinchwad : माजी नगरसेवकाच्या हत्येचा कट रचल्याप्रकरणी तीघांना अटक

सन २०२३-२४ या आर्थिक वर्षांतील मिळकतकरांची बिले सिध्दी प्रकल्पा अंतर्गत बचत गटाच्या महिलांच्या माध्यमातून घरोघरी १०० टक्के वाटप केली आहेत. याचा कर वसूलीतून मोठा फायदा झाला असल्याचे सहाय्यक आयुक्त नीलेश देशमुख यांनी म्हटले आहे.

शहरातील मालमत्ता धारकांना कर भरण्यासाठी १७ विभागीय कार्यालये आणि ऑनलाईनची सुविधा उपलब्ध करून देण्यात आलेली आहे. तर विविध सवलतींचा लाभ घेण्यासाठी ३० जूनची मुदत आहे. नागरिक संबंधित कर संकलन कार्यालयात बिले भरण्यासाठी गर्दी करीत आहेत. त्यामुळे गुरुवारी महापालिकेला सुट्टी असली तरी कर संकलनची सर्व कार्यालये सुरुच ठेवण्याचा निर्णय महापालिकेने घेतला आहे.

विविध कर सवलतींचा लाभ घेण्यासाठी शेवटचे दोन दिवस बाकी आहेत. त्यामुळे नागरिकांच्या सोयीसाठी सुट्टीच्या दिवशी कर संकलनची सर्व कार्यालये सुरुच राहणार आहेत. तसेच शहरातील कोणत्याही भागातील मालमत्ता धारकांना कोणत्याही विभागीय कार्यालयात कर भरण्याची सुविधा उपलब्ध करून दिली आहे.
शेखर सिंह, आयुक्त तथा प्रशासक पिंपरी-चिंचवड महापालिका.

Job AlertJob Alert Job Alert Job Alert

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button