Uncategorizedताज्या घडामोडीमुंबई

शिंदे सरकारच्या, उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस मंत्रिमंडळात फक्त १२ ते १५ आमदारांना मिळणार संधी?

मुंबईः मुख्यमंत्री एकनाथ शिंदे  आणि उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस  यांनी राज्याची सूत्रे हाती घेऊन एक आठवडा लोटला आहे. मात्र, अद्यापही मंत्रिमंडळ विस्ताराची  प्रक्रिया पुढे सरकली नाहीये. मंत्रिमंडळात कोणत्या आमदारांची वर्णी लागणार याची प्रतीक्षा असतानाच मंत्रिमंडळ विस्ताराबाबत शिंदे- फडणवीस सरकारचे आस्ते कदम असल्याचं बोललं जात आहे.

१८ जुलै रोजी राष्ट्रपती पदाची निवडणूक होत आहे. त्यापूर्वी भाजपच्या राष्ट्रपतीपदाच्या उमेदवार द्रौपदी मूर्म या १४ जुलै रोजी मुंबई दौऱ्यावर येत आहेत. त्यामुळं मंत्रिमंडळाचा विस्ताराची तारिख पुढे ढकलण्यात येण्याची दाट शक्यता आहे, अशी माहिती भाजपच्या दिग्गज नेत्याने दिली आहे. राष्ट्रपतीपदाच्या निवडणुकीसाठी बहुतांश आमदारांना १८ जुलै रोजी मुंबईत हजेरी लावावी लागणार असल्याने, १७ किंवा १९ जुलैला मंत्रिमंडळ विस्तार करणे योग्य ठरेल, जेणेकरून आमदारांना त्यांच्या मतदारसंघातून पुन्हा मुंबईत यावे लागणार नाही, असंही त्यांनी म्हटलं आहे.

मुख्यमंत्री एकनाथ शिंदे आणि उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस सुरुवातीला मंत्रिमंडळातील सर्व ४३ पदे भरण्याऐवजी १२-१५ आमदारांचा मंत्रिमंडळात समावेश करू शकतात, असे भाजपच्या एका वरिष्ठ नेत्याने सांगितले. राज्य विधिमंडळाच्या पावसाळी अधिवेशनानंतर मंत्रिमंडळाचा पूर्ण विस्तार होऊ शकतो. “पावसाळी अधिवेशन १८ जुलैला सुरू होणार होते, आता ते २५ जुलैपर्यंत पुनर्निर्धारित करावे लागेल, मुख्यमंत्री आणि उपमुख्यमंत्री यांच्याशी चर्चा विधानसभा अध्यक्ष लवकरच ते जाहीर करतील, असंही ते म्हणाले.

एकनाथ शिंदे यांनी मुख्यमंत्रीपदाची शपथ घेतली आहे. विधानसभेतही भाजप व शिंदे गटाने विश्वासदर्शक ठराव जिंकला आहे. त्यामुळं आता मंत्रिमंडळ विस्ताराबाबत सरकार इतक्यात घाई करणार नाही, असं भाजपचे ज्येष्ठ नेते म्हणाले आहेत. मंत्रिमंडळ विस्तारातील दिरंगाईचा संबंध सर्वोच्च न्यायालयात प्रलंबित असलेल्या अपात्रतेच्या प्रकरणाशी जोडणे चुकीचे असल्याचेही त्यांनी स्पष्ट केले. या प्रकरणाची सुनावणी ११ जुलै रोजी होणार आहे. विधिमंडळाच्या नियुक्तीवरून शिवसेनेने सर्वोच्च न्यायालयात धाव घेतली होती.

शिंदे आणि फडणवीस यांच्या शपथविधीनंतर ५ जुलै रोजी मंत्रिमंडळाचा विस्तार होईल, अशी अपेक्षा होती, असे भाजपच्या नेत्याने सांगितले. मात्र, त्याच दिवशी फडणवीस हे त्यांच्या मूळ गावी नागपूरला दोन दिवसांच्या दौऱ्यावर रवाना झाले होते. आता, शिंदे देखील त्यांच्या मूळ गावी जातील आणि नंतर १० जुलै रोजी पंढरपूर येथे आषाढी एकादशी पूजेसाठी रवाना होतील, असं समजतंय.

बुधवारी मुंबईत परतल्यानंतर नवीन मंत्रिमंडळाच्या नियुक्त्या निश्चित करण्यासाठी शिंदे यांच्याशी चर्चा करणार असल्याचे फडणवीस यांनी मंगळवारी नागपुरात पत्रकारांशी बोलताना सांगितले. मंत्रिमंडळ विस्ताराबाबत सल्लामसलत करण्यासाठी शिंदे आणि फडणवीस दिल्लीत जाऊ शकतात, अशी शक्यताही भाजपच्या एका नेत्याने व्यक्त केली आहे. मंत्रिमंडळाची स्थापना इतकी सोपी गोष्ट नाहीये, शिंदे आणि फडणवीस यांना एकत्र बसून त्यावर तपशीलवार काम करावे लागेल. दोघेही भाजप नेतृत्वाशी सल्लामसलत करण्यासाठी दिल्लीला जाऊ शकतात, असं त्यांनी सांगितलं.

 

Job AlertJob Alert Job Alert

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button