breaking-newsताज्या घडामोडीव्यापार

#CoronaVirus: शेअर बाजारात पुन्हा घसरण

जागतिक बाजारातील स्थिती आणि कोरोना विषाणूची भीती या दोन्हींचा परिणाम पुन्हा एकदा मुंबई शेअर बाजार आणि राष्ट्रीय शेअर बाजारावर परिणाम.

मुंबई शेअर बाजाराचा निर्देशांक सेन्सेक्स सोमवारी बाजार उघडताच १६८८ अंकांनी घसरला. तर राष्ट्रीय शेअर बाजाराचा निर्देशांक निफ्टी ४३२ अंकांनी घसरला. जागतिक बाजारांमध्ये शेअर्सच्या विक्रीचा सपाटा सोमवारीही कायम राहिला. अमेरिकेतील फेडरल रिझर्व्ह बँकेने प्रमुख व्याजदरात कपात केली आहे. त्याचबरोबर कोरोना विषाणूचे जगात वेगाने संक्रमण होईल, अशी चिंता व्यक्त केली आहे. त्याचा परिणाम सोमवारी सकाळी भारतीय बाजारांमध्ये दिसला.

अमेरिकी डॉलरच्या तुलनेत भारतीय रुपयामध्ये घसरण झाल्याचे सोमवारी सकाळी दिसले. एक डॉलरसाठी ७४.११ रुपये इतके मोजावे लागणार असल्याचे सोमवारी सकाळी दिसले. शुक्रवारी डॉलरच्या तुलनेत भारतीय रुपया ७३.९१ एवढ्यावर होता.

Job AlertJob Alert Job Alert Job Alert

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button