breaking-newsताज्या घडामोडीपिंपरी / चिंचवड

राजर्षी छत्रपती शाहू महाराज जयंतीनिमित्त ऑनलाईन विचार प्रबोधन पर्व

पिंपरी / महाईन्यूज

पिंपरी चिंचवड महानगरपालिकेच्या वतीने राजर्षी छत्रपती शाहू महाराज जयंती निमित्त विचार प्रबोधन पर्वाच्या ऑनलाईन कार्यक्रमाचे आयोजन करण्यात आले होते. त्याचे उद्घाटन आज महापौर उषा उर्फ माई ढोरे यांच्या हस्ते संपन्न झाले.

यावेळी जैव विविधता व्यवस्थापन समिती अध्यक्षा उषा मुंढे, प्रभाग अध्यक्षा शर्मिला बाबर, नगरसदस्या अनुराधा गोरखे, जनता संपर्क अधिकारी किरण गायकवाड, विभागाचे प्रफुल्ल पुराणिक, सामाजिक
कार्यकर्ते पांडुरंग पाटील, सुनिल पाटील, नामदेव शिंत्रे, वसंत पाटील, अनिल पाटील उपस्थित होते.

युवाशाहीर रामानंद उगले यांनी त्यांच्या सहका-यांसमवेत राजर्षी छत्रपती शाहू महाराज यांच्या जीवनावर आधारीत शाहिरी पोवाड्यांचा कार्यक्रम सादर केला. महाराष्ट्राची लोककलेचा जगभर कार्यक्रम करणारे सुप्रसिद्ध सिने कलाकार विनोद धोकटे यांनी महाराष्ट्राच्या सांस्कृतिक विविधता आणि संस्कृतीचे माहात्म्य दर्शविणारा “महाराष्ट्राची परंपरा” हा कार्यक्रम सादर केला. त्यांना बाळूमामाची नावाने चांगभलं फेम स्वाती धोकटे,नृत्य दिग्दर्शक संतोष
अवचित्ते,शाहीर अरूण गायकवाड यांची साथ लाभली. कार्यक्रमाचे ऑनलाईन प्रक्षेपण www.facebook.com/pcmcindia.gov.in  या  फेसबुक लिंकवर लाईव्ह दाखविण्यात आले
असून या कार्यक्रमास फेसबुकवर हजारो प्रेक्षकांनी ऑनलाईन भेट दिली.

कार्यक्रमाचे सूत्रसंचालन माहिती व जनसंपर्क विभागाचे प्रफुल्ल पुराणिक यांनी केले.

Job AlertJob Alert Job Alert Job Alert

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button