breaking-newsTOP Newsताज्या घडामोडीपिंपरी / चिंचवडसिटझन रिपोर्टर

‘ऑन दी स्पॉट’ फैसला : ‘महाईन्यूज’ च्या वृत्ताची महापालिका प्रशासनाकडून दखल !

अवघ्या ४ तासांत स्माशनभूमी चकाचक : अतिरिक्त आयुक्त उल्हास जगताप यांचा कर्तव्यदक्षपणा

पिंपरी:  विशेष प्रतिनिधी

निगडी अमरधाम स्मशानभूमीतील शौचालयाची दुरावस्था आणि अस्वच्छता निदर्शनास आल्यानंतर अवघ्या ४ तासांत स्मशानभूमी चकाचक करण्यात आली. यासह या ठिकाणी येणाऱ्या नागरिकांसाठी फिरते शौचालयही कार्यान्वयीत करण्यात आले. त्यामुळे नागरिकांमध्ये समाधान व्यक्त होत आहे.

‘‘महाईन्यूज’’ ने प्रसिद्ध केलेल्या वृत्ताची दखल घेत महापालिका अतिरिक्त आयुक्त उल्हास जगताप यांनी ‘ऑन दी स्पॉट फैसला’ केला आणि यंत्रणा कामाला लावली. जगताप यांच्या कर्तव्यदक्षपणामुळे प्रशासनात कर्तव्याप्रति ‘डोळेझाक’ करणाऱ्या अधिकाऱ्यांच्या डोळ्यांत अंजन पडले आहे.

संबंधित स्मशानभूमितील सदर शौचालय तब्बल दोन वर्षांपासून बंद आहे. प्रशासनाच्या वतीने नवीन शौचालय बांधण्याच्या कामास सुरुवात करण्यात आली होती. परंतू, या कामास पाच महिन्यांचा कालावधी उलटून देखील महापालिकेने नेमलेल्या ठेकेदाराकडून अद्यापही काम पूर्ण केले नाही. अत्यंत संथ गतीने चाललेल्या शौचालयाच्या बांधकामामुळे तेथे अंत्यविधीसाठी येणाऱ्या नागरिकांना गैरसोयींचा सामना करावा लागत आहे. त्यामुळे या तक्रारीची दखल घेऊन शौचालयाचे काम तात्काळ सुरू करण्यात यावे, अशी मागणी सामाजिक कार्यकर्ते दिपक खैरनार यांनी केली होती. याबाबत शुक्रवारी सकाळी वृत्त प्रसिद्ध करण्यात आले.

‘‘महाईन्यूज’’ आजच्या अंकात प्रसिद्ध झालेले वृत्त

दरम्यान, अतिरिक्त आयुक्त उल्हास जगताप यांनी फ-क्षेत्रीय कार्यालयाचे सहायक आरोग्य अधिकारी माने यांना धारेवर धरले. यंत्रणा कामाला लागली आणि स्मशानभूमीच्या स्वच्छतेचे काम पूर्णही करण्यात आले. यासह या ठिकाणी अंत्यविधीसाठी येणाऱ्या नागरिकांकरिता फिरते शौचालय तात्काळ कार्यान्वयीत करण्यात आले. तसेच नियमित साफसफाई करण्याचे आदेश दिले आहेत.

पिंपरी-चिंचवडमधील सर्वसामान्य नागरिकांना पायाभूत सोयी-सुविधा सक्षमपणे पुरवण्यासाठी महापालिका कटिबद्ध आहे. नागरिकांनी काही तक्रारी असल्यास तात्काळ ‘सारथी’ हेल्पलाईनला संपर्क करावा. नागरिकांच्या तक्रारी सोडवण्यासाठी प्रशासन प्राधान्याने पुढाकार घेत आहे. स्वच्छतेबाबत कोणताही हलगर्जीपणा होणार नाही, याची दक्षता घेतली जात आहे.
– उल्हास जगताप, अतिरिक्त आयुक्त, पिंपरी-चिंचवड महापालिका.

Job AlertJob Alert Job Alert Job Alert

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button