TOP Newsताज्या घडामोडीपुणे

दिवाळीनिमित्त यंदाही येरवडा कारागृहातील कैद्यांनी (बंदी) घडविलेल्या विविध गृहोपयोगी वस्तूंच्या प्रदर्शनाचे आयाेजन

येरवडा | दिवाळीनिमित्त यंदाही येरवडा कारागृहातील कैद्यांनी (बंदी) घडविलेल्या विविध गृहोपयोगी वस्तूंच्या प्रदर्शनाचे आयाेजन करण्यात आले आहे. कैद्यांच्या कलागुणांना वाव देण्यासाठी कारागृह प्रशासनाकडून या उपक्रमाचे आयोजन करण्यात आले आहे.

येरवडा मध्यवर्ती कारागृह देशातील दुसऱ्या क्रमांकाचे मोठे कारागृह आहे. या कारागृहात विविध गुन्ह्यात शिक्षा झालेले कैदी शिक्षा भोगत असून शिक्षा कालावधीत कैद्यांना कारागृहात वेळ व्यतीत करायचा असतो. कैद्यांच्या कलागुणांना वाव देण्यासाठी कारागृह प्रशासनाकडून त्यांना विविध कलात्मक वस्तू घडविण्याचे प्रशिक्षण दिले जाते. कारागृहात सुतारकाम, शिवणकाम, बागकाम, बेकरी उत्पादने तसेच विविध वस्तू घडविण्याचे प्रशिक्षण दिले जाते. दरवर्षी दिवाळी, राखी पौर्णिमा, नाताळ, गणेशोत्सवात कैद्यांनी घडविलेल्या वस्तुंचे प्रदर्शन आयोजित केले जाते. दिवाळीनिमित्त आयोजित केलेल्या प्रदर्शनाचे उद्घाटन संरक्षण संशोधन आणि विकास संस्थेतील शास्त्रज्ञ प्रदीप एम. कुरलकर यांच्या हस्ते करण्यात आले. याप्रसंगी डाॅ. भारती कुरलकर, कारागृह उपमहानिरीक्षक (पश्चिम विभाग) स्वाती साठे, उपमहानिरीक्षक सुनील ढमाळ (मुख्यालय), दौलतराव जाधव तुरंग अधिकारी महाविद्यालयाचे प्राचार्य चंद्रमणी इंदूरकर, येरवडा मध्यवर्ती कारागृहाचे अधीक्षक शिवशंकर पाटील, उर्मिला पाटणकर, सुषमा कोंडे-देशमुख आदी उपस्थित होते.

कारागृहात विविध शासकीय कार्यालयांना लागणारी लोखंडी कपाटे, फर्निचर, गणवेश, सतरंजी, फाईल, बेडशीट, टाॅवेल आदी वस्तू तयार केल्या जातात. या वस्तुंचा दर्जा चांगला असल्याने नागरिकांकडून मोठी मागणी असते. विमानतळ रस्त्यावरील येरवडा कारागृहाच्या उद्योग विक्री केंद्रात सकाळी आठ ते रात्री आठ या वेळेत प्रदर्शनाचे आयोजन करण्यात आले आहे. दिवाळीपर्यंत हे प्रदर्शन सुरू राहणार असल्याची माहिती कारागृह प्रशासनाने दिली.

Job AlertJob Alert Job Alert Job Alert

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button