TOP Newsटेक -तंत्रताज्या घडामोडीदृष्टीक्षेपपिंपरी / चिंचवडमहाराष्ट्रराष्ट्रिय

दिघीत बारी समाज विकास ट्रस्टच्यावतीने श्री संत रुपलाल महाराज मुर्ति प्राणप्रतिष्ठा सोहळयाचे आयोजन

  • भक्ती-भावात संत शिरोमणी रुपलाल महाराजांची पालखी मिरवणुक उत्साहात

पिंपरी : दिघी येथे बारी समाज विकास ट्रस्ट पिंपरी चिंचवड, पुणे यांच्यावतीने श्री संत शिरोमणी रुपलाल महाराज मंदिरामध्ये श्री संत रूपलाल महाराज मुर्ती प्राणप्रतिष्ठा, श्री विठ्ठल रुखमाई मुर्ती प्राणप्रतिष्ठा तसेच कलश स्थापना व वसतिगृह लोकार्पण सोहळयाचे आयोजन करण्यात आले आहे. सोहळयानिमित्त्त गजानन महाराज मंदिराजवळ, मॅग्झीन कॉर्नर चौक, दिघी, भोसरी याठिकाणी शुक्रवार दि. २०ते दि. २६ जानेवारी २०२३ या कालावधीत विविध कार्यक्रम घेण्यात येत असून मंगळवार दि. २४ रोजी भक्ती भावात तल्लीन होवून संतांचा जयघोष करीत पालखी शोभायात्रा काढण्यात आली.

सिध्देश्वर शाळा, गंगा निवास ते संत रुपलाल महाराज मंदिर या मार्गावर काढण्यात आलेल्या शोभायात्रेत ट्रस्टचे अध्यक्ष ओंकार काटोले, सुयश फाऊंडेशनचे सचिव सुरेश अस्वार, पोलीस अधिक्षक (सीआडी, पुणे) डॉ. दिनेश बारी, विठ्ठलराव बारी, कामधेनु संस्थेचे अध्यक्ष सुनिल साळुंके, अष्टविनाय डेव्हलपर्सचे संचालक नागेश वसतकार, योगेश बारी, भाजप म.आ.मो. सरचिटणीस कविता मोगाळे पाटील, विदर्भ माळी उत्कर्ष संघाचे अध्यक्ष श्रीकृष्ण वावगे, ट्रस्टचे सचिव दिनेश रौंदळे, उपाध्यक्ष राजेश काळपांडे, सह-सचिव भरत बारी, कार्याध्यक्ष शेषराव नानग्दे, खजिनदार विठ्ठल कपले, प्रशांत बारी, डॉ. अतुल कोल्हे, अनंता दामधर, समाधान दलाल, विजय कोथळकर, रमेश भोंडे, संजय बारी, आतिश ढगे, अशोक धुळे, सुरेश मिसाळ, संदिप हिस्सल, कविताताई ढगे, मनिषाताई धुळे यांच्यासह समाज बांधवांनी मोठया संख्येने सहभाग घेतला.

सोहळा कालावधीत श्री ग्रंथराज ज्ञानेश्वरी पारायण सकाळी ९ ते ११. दुपारी ३ ते ५, काकडा आरती - सकाळी ६ ते ७, हरिपाठ - संध्याकाळी ५:३० ते ६:३०असे कार्यक्रम घेण्यात येत आहेत. यासाठी कथा प्रवक्ते म्हणून हभप पुरुषोत्तम महाराज नेमाडे (पंढरपुर), हभप श्रीकृष्ण महाराज हिंगणे (मेहुणकर), राष्ट्रीय प्रबोधनकार संगीता बोडखे (जळगाव जा.). साथ संगत - नागेश्वर सांप्रदायिक भजन मंडळ वरवट बकाल, बुलढाणा एकलारा, बाबनबीर, जळगाव जा., उमरा, दानापूर, सोगोडा, सुनगांव, अकोट, अंजनगाव, वानखेड, जामोद हे सेवा देत आहेत. मुर्ती प्राणप्रतिष्ठा सोहळयात कार्यक्रमात सकाळी शोभायात्रा, संध्याकाळी पुजास्थापना, कलशस्थापना, धान्यदिवस, शयनवास कार्यक्रम घेण्यात आले. तर, बुधवार दि. २५ रोजी मुर्ती अभिषेक, पुष्प दिवस, जल दिवस, वस्त्र दिवस, द्रव्य दिवस तसेच स्नेह संमेलन, स्नेह भोजन आणि हवन विधी होणार आहे.

या सोहळयास प्रमुख अतिथी म्हणून भोसरी विधानसभा आमदार महेशदादा लांडगे, जळगांव जा. विधानसभा आमदार डॉ. संजय कुटे, विधान परिषद आमदार प्रविण दटके, माजी मंत्री रामदास बोडखे, माजी आमदार विलास लांडे, मा. महापौर राहुल जाधव, माजी उपमहापौर हिराबाई (नानी) घुले, राष्ट्रवादी काँग्रेस पार्टीचे शहराध्यक्ष अजित गव्हाणे, माजी नगरसेवक सागर गवळी, मा. नगरसेविका निर्मलाताई गायकवाड, ई प्रभाग मा. सभापती विकासमाऊ डोळस, माजी नगरसेवक चंद्रकांत वाळके, जिल्हा नियोजन समिती सदस्य विजय फुगे, टाटा मोटर्स एम्पॉईज युनियन अध्यक्ष सचिन लांडगे, भाजप सरचिटणीस पिं.चिं. शहर कुलदिप परांडे, राष्ट्रीय खेळाडु योगेश लांडगे, सामाजिक कार्यकर्ते निलेश बोराटे, अशोक वाळके, बारी स.वि. मंडळ वि.अध्यक्ष भानुदास दाभाडे, अखिल भारतीय बारी महासंघ अध्यक्ष रमेश घोलप, उद्योजक मंगेश थोरात, बारी युवा प्रकोष्ट राष्ट्रीय उपाध्यक्ष रविंद्र धामणे, बनसोडे रियल इस्टेट कंसल्टंनचे राजेंद्र बनसोडे, उद्योजक संतोष तोटे, विदर्भ मित्र मंडळ मा. अध्यक्ष हरिभाऊ तांदळे, बारी युवा प्रकोष्ट राष्ट्रीय कार्याध्यक्ष डॉ. निलेशजी अस्वार, विदर्भ मित्र मंडळ अध्यक्ष भगवान आढाव पाटील आदी मान्यवर उपस्थित राहतील. तसेच, गुरुवार दि. २६ रोजी पुर्णाहुती प्राणप्रतिष्ठा, कलश स्थापना, सकाळी हभप पुरुषोत्तम महाराज नेमाडे, पंढरपुर यांचे काल्याचे किर्तन व महाप्रसादाचा कार्यक्रम होईल, अशी माहिती बारी समाज विकास ट्रस्टचे संस्थापक अध्यक्ष ओंकार काटोले यांनी दिली आहे.

Job AlertJob Alert Job Alert Job Alert

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button