ताज्या घडामोडीपुणे

आदित्य ठाकरे पुणे दौऱ्यावर, आगामी महापालिका निवडणुकीत आघाडी होणार का याकडे सर्वांचे लक्ष

पुणे | पुणे पालिकेचा प्रारूप प्रभाग रचनेचा आराखडा जाहीर झालाय. त्यानंतर प्रकारे महापालिका निवडणुकीचे बिगुल वाजले. महापालिका आपल्या ताब्यात घेण्यासाठी राष्ट्रवादीने कंबर कसली तर पुन्हा महापालिका आपल्याच ताब्यात कशी राहील यासाठी भाजपनेही प्रयत्न सुरू केले.तर शिवसेनेने देखील ही निवडणूक गांभीर्याने घेतल्याचे दिसून येते. यापूर्वी शिवसेना नेते संजय राऊत आणि आदित्य ठाकरे यांनी पुणे दौरा करत पदाधिकाऱ्यासोबत बैठका घेतल्या. त्यानंतर पुन्हा एकदा पर्यावरण मंत्री आदित्य ठाकरे दोन दिवसांच्या पुणे दौर्‍यावर येणार आहेत. सहा आणि सात फेब्रुवारी रोजी ते पुण्यात पदाधिकाऱ्यांसोबत बैठक घेऊन आढावा घेतील.

पुणे दौऱ्यावर येणार असलेले आदित्य ठाकरे पुण्यातील पदाधिकाऱ्यांशी संवाद साधणार आहेत. याशिवाय पुणे शहरातील राजकारणाचा ते आढावा घेणार आहेत. आगामी महापालिका निवडणुकीत युती करायची की नाही यावर देखील चर्चा होण्याची दाट शक्यता आहे.. प्रभाग रचना जाहीर झाल्यानंतर राष्ट्रवादी काँग्रेसने स्वबळावर निवडणूक लढवण्याची भाषा केली आहे. तर शिवसेना देखील एकटी लढण्यास समर्थन असल्याचं शहरप्रमुख संजय मोरे यांनी सांगितले. मात्र असं असलं तरीही युती संदर्भातला अंतिम निर्णय पक्षप्रमुख उद्धव ठाकरेच घेतील.

दुसरीकडे उपमुख्यमंत्री अजित पवार यांनी देखील आगामी महापालिका निवडणुकीसाठी जोरदार तयारी सुरू केली असल्याचे चित्र आहे. त्यामुळे दर शनिवारी पुण्यात आढावा बैठक घेणारे उपमुख्यमंत्री अजित पवार स्वबळावर लढणार की आघाडी करणार याकडे देखील सर्वांचे लक्ष लागले आहे.

Job AlertJob Alert Job Alert Job Alert

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button