पिंपरी / चिंचवड

पोलिसाची गचांडी पकडून शिवीगाळ करत सरकारी कामात अडथळा; तिघांना अटक

पिंपरी l प्रतिनिधी

पोलीस ठाण्यात कर्तव्यावर निघालेल्या पोलिसाची वाट अडवून गचांडी पकडून शिवीगाळ करत सरकारी कामत अडथळा निर्माण केला. हा प्रकार मंगळवारी (दि. 22) रात्री नऊ वाजता भुजबळवस्ती, हिंजवडी येथे घडला. याप्रकरणी तिघांना पोलिसांनी अटक केली आहे.

मनोहर निवृत्ती येवले (वय 21), वैभव भारत लोंढे (वय 30), राजकुमार देविदास कांबळे (वय 32, तिघे रा. भुजबळ वस्ती, हिंजवडी) अशी अटक केलेल्या आरोपींची नावे आहेत. याप्रकरणी पोलीस नाईक सचिन बेबले यांनी हिंजवडी पोलीस ठाण्यात फिर्याद दिली आहे.

पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, फिर्यादी हे भुजबळ वस्ती, हिंजवडी येथे सिमेंट काँक्रिटीकरण सुरु असल्याने सिमेंट काँक्रिटीकरणचा ट्रक पाठीमागे घेण्यासाठी थांबले होते. ट्रक पाठीमागे गेला तरी देखील आरोपींनी परिसरात वाहतुकीला अडथळा केला. फिर्यादी हे बावधन चौकीत कर्तव्यावर जात होते. त्यांनी आरोपींना विचारणा केली असता आरोपींनी फिर्यादी यांची गचुंडी पकडून शिवीगाळ केली. फिर्यादी यांचा हात पिरगाळून सरकारी कामात अडथळा निर्माण केला. पोलिसांनी तिघांना अटक केली आहे. हिंजवडी पोलीस तपास करीत आहेत.

Job AlertJob Alert Job Alert Job Alert

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button