breaking-newsआंतरराष्टीयताज्या घडामोडी

आता युद्ध अटळ! युक्रेनच्या राखीव सैन्यालाही तयार राहण्याचे आदेश

मास्को | टीम ऑनलाइन
रशिया आणि युक्रेन यांच्यातील संघर्ष आता निर्णायक वळणावर पोचला आहे. एकीकडे रशियाचे सैन्य युक्रेनच्या सीमेच्या दिशेने कूच करीत असतानाच युक्रेनचे राष्ट्रपती जेलेन्स्की यांनीही युक्रेनच्या राखीव सैन्यालाही तयार राहण्याचे आदेश दिले आहेत. त्यामुळे आता रशिया आणि युक्रेन यांच्यातील युद्ध अटळ आहे.

रशियाने युक्रेनचे लुहान्त्सक आणि दोहांतसक हे दोन्ही प्रांत स्वतंत्र केल्यापासून युक्रेनचे समर्थक असलेले युरोपियन देश आणि अमेरिका यांनी युक्रेनची लष्करी मदत वाढवायला सुरुवात केली आहे. तसेच आर्थिक निर्बंधांना सुद्धा रशिया जुमानायला तयार नाही. उलट रशियन संसदेने युक्रेनवरील लष्करी कारवाईला परवानगी दिल्यानंतर रशियन फौजा अधिकच आक्रमक झाल्या आहेत. तसेच, युक्रेनला तिन्ही बाजूने घेरण्यात आले आहे. त्यामुळेच आज युक्रेनचे राष्टपती जेलेन्स्की यांनी युक्रेनच्या राखीव सैन्याला तयार राहण्याचे आदेश दिले आहेत. त्यामुळे युक्रेन रशिया यांच्यातील युद्ध अटळ आहे. दरम्यान फ्रान्सच्या राष्ट्रपतींनी या वादात मध्यस्थी करण्याचा प्रयत्न केला होता, पण त्यांना यश आले नाही. तर या वादात भारताची मात्र कोंडी झाली आहे. जर युक्रेन रशिया युद्धाच्या दरम्यान विश्व युद्ध भडकले तर रशिया आणि अमेरिका हे दोन्ही भारताचे मित्र असल्याने कोणाच्या बाजूने जायचे याबाबतचा निर्णय घेणे भारताला अवघड होईल.

Job AlertJob Alert Job Alert Job Alert

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button