TOP Newsताज्या घडामोडीमनोरंजन

 जाहिरातीतच नव्हे तर वास्तविक जीवन मध्ये ही ‘या’ 5 गोष्टींमुळे मुलांकडे मुली होतात आकर्षित

आपण जेव्हा एखाद्या नात्यात येण्याचा विचार करतो तेव्हा आपण समोरील व्यक्तीमध्ये अनेक गोष्टी पाहत असतो. एखाद्या व्यक्तीवर छाप पाडण्यासाठी व्यक्तिमत्त्व खूप महत्त्वाचे आहे. हल्ली खूप कमी लोक समोरील व्यक्तीच्या मनाचा विचार करतात, महिला असो किंवा पुरुष असो एकमेकांकडे आकर्षित होण्यासाठी दिसणं खूप महत्त्वाचे मानले जाते. तर आज आम्ही तुम्हाला सागंणार आहोत की महिला पुरुषांच्या कोणत्या गोष्टींकडे सर्वात आधी आकर्षित होतात. इतकेच नाही तर विज्ञानानेही या दाव्यांना पुष्टी दिली आहे.

परफ्यूम लावणारे पुरुष

महिलांना सुगंध जास्त आकर्षित होतो असं म्हटंले जाते. जाहिरातीत अनेकदा महिलांना परफ्यूम लावणारे पुरुष जास्त आकर्षित करतात. 2009 मध्ये जर्नल ऑफ कॉस्मेटिक सायन्समध्ये प्रकाशित झालेल्या एका अभ्यासात असेही सांगण्यात आले होते की जे पुरुष परफ्यूम लावतात ते महिलांना आकर्षित करतात

वयाने मोठे असलेले पुरुष

मुली अनेकदा त्यांच्या वयापेक्षा मोठे असलेल्या पुरुषांना प्राधान्य देतात. 2010 मध्ये आलेल्या अभ्यासात हे पुष्टी करण्यात आली आहे की, बहुतेक महिला मोठ्या दिसणाऱ्या पुरुषांकडे जास्त आकर्षित होतात. यासोबतच, अभ्यासात असेही समोर आले आहे की, वयाने मोठ्या असण्यासोबतच आर्थिकदृष्ट्या स्वतंत्र महिला जीवनात स्थिर पुरुषांना प्राधान्य देतात.

स्वच्छतेची काळजी घेणारे पुरुष

दिसण्यासोबतच स्वच्छतेची काळजी घेणारे पुरुष मुलींना आवडतात. अनेक अभ्यासांमध्ये असे सांगण्यात आले आहे की चांगले दिसणे आणि ड्रेसिंग सेन्स व्यतिरिक्त, जे मुले स्वच्छतेची काळजी घेतात ते मुलींना त्यांच्याकडे आकर्षित करतात.

ट्रिम्ड बियर्ड असलेली मुले

आजकाल ट्रिम्ड बियर्डचा ट्रेंड वाढत चालला आहे, कारण मुली अशा मुलांकडे खूप आकर्षित होतात. म्हणजेच ज्या मुलांची दाढी फार मोठी किंवा लहानही नाही, अशा मुलांकडे मुली सर्वाधिक आकर्षित होतात. युनिव्हर्सिटी ऑफ न्यू साउथ वेल्सच्या एका अभ्यासात हे सिद्ध झाले आहे की छाटलेली दाढी असलेले पुरुष महिलांना जास्त आकर्षक असतात.

शारीरिकदृष्ट्या तंदुरुस्त मुले

शारीरिकदृष्ट्या तंदुरुस्त मुले नेहमीच मुलींची पहिली पसंती असतात आणि कॅलिफोर्निया विद्यापीठाच्या अभ्यासातूनही हे समोर आले आहे. अभ्यासानुसार, महिलांना शारीरिकदृष्ट्या तंदुरुस्त पुरुष जास्त आवडतात. 

Job AlertJob Alert Job Alert Job Alert

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button