breaking-newsTOP Newsताज्या घडामोडीदेश-विदेशमहाराष्ट्रराजकारणराष्ट्रिय

भाजपविरोधात विरोधकांची मोट, नितीश कुमारांची मोठी घोषणा!

दिल्ली : बिहारची राजधानी असलेल्या पाटणा येथे आज विरोधी पक्षांच्या बड्या नेत्यांची बैठक पार पडली. भाजप विरोधातील २० हून अधिक पक्षातील नेत्यांनी या बैठकीला उपस्थिती लावली होती. या बैठकीसाठी काँग्रेस, जेडीयू, आरजेडी, टीएमसी आणि आम आदमी पार्टी तसेच इतर अनेक पक्षांचे नेते सहभागी झाली होते. तर महाराष्ट्रातून देखील शरद पवार, उद्धव ठाकरे यांच्यासह पक्षांचे नेते या बैठकीला उपस्थित होते.

नितीश कुमार म्हणाले की, आज ही अत्यंत चांगली बैठक झाली. सर्वांनी एकत्र चालण्याची सहमती दर्शवली आहे. येत्या काळात सर्व पक्षीयांची आणखी एक बैठक होणार आहे. पुढची रणनीती ठरवण्यासाठी या पुढच्या बैठकीत होणार आहे. एकत्र निवडणूक लढवण्याची सहमती आजच्या बैठकीत झाली आहे.

पुढच्या बैठकीत अंतिम रूप घेतलं जाईल. कोण लुठून लढवणार हे या बैठकीत ठरवलं जाईल. सध्या जे शासनमध्ये आहेत ते देशहिताचं काम करत नाहीयत. ते देशाच्या इतिहास बदलायला निघाले आहेत. स्वातंत्र्यांच्या लढाईलाही ते विसरतील. यामुळे चिंता निर्माण झाली आहे. त्यामुळे विरोधक एकजूट राहणार आहेत. राज्यातील सरकारवरून आव्हाने निर्माण झाली तर सर्व एकत्र राहणार आहेत, असं नितीश कुमार म्हणाले.

हेही वाचा – राष्ट्रवादी काँग्रेसला मोठा धक्का! लावणीसम्राज्ञी सुरेखा पुणेकर यांचा पक्षाला रामराम

सर्व पक्षाचे वरिष्ठ नेता आले आहेत. मी त्यांचं सर्वांच स्वागत करतो. नितीश कुमार यांनी आज जेवणात बिहारचे सर्व खाद्य पदार्थांची चव चाखायला दिली. त्यासाठी धन्यवाद. भारताच्या मूळ गोष्टीवर आक्रमण होतोय. ही विचारधारेची लढाई आहे. यासाठी आपण सर्व एकत्र उभे आहोत. आमच्यात जरुर काही मतभेद असू शकतात. पण आम्ही फ्लेक्सिबिलीटीने एकत्र काम करु. आम्ही आमच्या विचारधारेचं रक्षण करण्याचं ठरवलं आहे. आम्ही पुढच्या बैठकीत आणखी खोलवर चर्चा करु, असं राहुल गांधी म्हणाले.

देशात आज अनेक समस्या आम्ही बघत आहोत. आम्ही सर्वांनी एकत्रपणे पुढे जाण्याचं ठरवलं आहे. पाटण्यात जे सुरु झालंय ते पुढे घेऊन जाईल याचा मला विश्वास आहे. देशातील अनेक आंदोलनं पाटण्यातून सुरु झाली आहेत. देशाची जनता आमचं समर्थन करणार याचा मला विश्वास आहे, असं राष्ट्रवादी काँग्रेसचे अध्यक्ष शरद पवार म्हणाले.

Job AlertJob Alert Job Alert Job Alert

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button