breaking-newsTOP Newsताज्या घडामोडीराष्ट्रिय

वर्षभरात देशातील टोलनाके हटवणार, नितीन गडकरी यांची मोठी घोषणा

नवी दिल्ली – केंद्रीय रस्ते वाहतूक मंत्री नितीन गडकरी यांनी लोकसभेत मोठी घोषणा केली आहे. येत्या वर्षभरात सर्व टोलनाके हटवण्यात येतील. टोलच्या जागी GPS यंत्रणा बसवण्यात येईल, असं नितीन गडकरी म्हणाले. सर्व टोलनाके रद्द करण्याच्या योजनेवर सरकार काम करत असल्याचं त्यांनी सांगितलं. लोक रस्तेप्रवास जेव्हढा करतील, तेव्हढाच त्यांना टोल द्यावा लागेल, अशा पद्धतीचे तंत्रज्ञान विकसित करण्याचं काम सुरु असल्याचं गडकरींनी नमूद केलं.

वाचा :-TMC म्हणजे ट्रान्सफर माय कमिशन; नरेंद्र मोदींचा टोला

उत्तर प्रदेशातील अमरोहा मतदारसंघातील बस पा खासदार कुंवर दानिश अली यांनी महापालिकेच्या टोलचा मुद्दा संसदेत उपस्थित केला. त्यावर गडकरींनी उत्तर दिलं.नितीन गडकरी म्हणाले, “जर आम्ही टोलनाके बंद केले तर रस्ते बनवणाऱ्या कंपन्या आमच्याकडे भरपाई मागतील. मात्र सरकारने पुढील वर्षभरात सर्व टोलनाके हटवण्याची योजना केली आहे”

टोल हटवणे म्हणजे टोलनाके हटवणे असा अर्थ आहे. सध्या सरकार अशा तंत्रज्ञानावर काम करत आहे, जिथे तुम्ही हायवेवर प्रवेश करताच, जीपीएसच्या मदतीने तुमचा फोटो काढला जाईल. जिथून तुम्ही हायवे सोडाल, तिथेही फोटो घेतला जाईल. म्हणजे तुम्ही जेव्हढा हायवेचा प्रवास केला किंवा जेव्हढा रस्ता वापरला तेव्हढाच टोल तुम्हाला द्यावा लागेल, असं गडकरी म्हणाले.

Job AlertJob Alert Job Alert Job Alert

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button